Ration Card Subsidy Maharashtra 2024 मित्रांनो रेशनिंग कार्ड धान्य ऐवजी रोख रक्कम तुम्हाला देखील पाहिजे आहे का यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग यांच्याद्वारे शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यामध्ये पात्रता काय असणार तसेच कोणत्या जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना रोख रक्कम दिली जाणार याबद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे. यामध्ये अर्ज देखील सुरू झाला असून अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज जमा करावा लागणार आहे.
Ration Card Subsidy Amount Maharashtra
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग द्वारे शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये राज्यातील चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील नागरिकांना एपीएल किंवा केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे अन्नधान्याच्या ऐवजी डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आणि यामुळेच आता अन्नधान्य ऐवजी म्हणजेच की जे लाभार्थी अन्नधान्य घेत नाहीत त्यांना रक्कम देण्यात येणार आहे. तुम्ही देखील शिधापत्रिकाधारक असल्यास आणि खालील जिल्ह्यांमध्ये तुमचा समावेश असल्यास तुम्ही अन्नधान्य घेत नसल्यास तुम्हाला देखील हा अर्ज करता येणार आहे.
या 14 जिल्ह्यांतील शिधापत्रिका धारकांना मिळणार रोख रक्कम –
- छत्रपती संभाजीनगर
- बीड
- जालना
- नांदेड
- धाराशिव
- परभणी
- लातूर
- हिंगोली
- अमरावती
- अकोला
- बुलढाणा
- वाशिम
- यवतमाळ
- वर्धा
Ration Card Subsidy Withdrawal Form Maharashtra
यासाठी शिधापत्रिकाधारकांना खाली देण्यात आलेला अर्जाची प्रिंट काढायचे आहे आणि त्या अर्जासोबत मागविण्यात आलेली सर्व आवश्यक कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने तहसील कार्यालय अंतर्गत जमा करायची आहेत त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जातील माहिती तालुका स्तरावरील डेटा एन्ट्री ऑपरेटर यांच्याकडून संगणक समाविष्ट करण्यात येईल.
सदर माहितीची छाननी करून संबंधित तहसीलदार पात्र लाभार्थ्यांची रास्त भाव दुकाने हा यादी तयार करतील सदर यादी तहसीलदार संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अग्रेषित करतील संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी लाभार्थ्यांच्या माहितीच्या आधारे त्यांच्या बँक खात्यात रक्कम डीबीटी द्वारे जमा करतील.
यासाठी लाभार्थींच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणे अत्यंत आवश्यक असणार आहे कारण हा निधी डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्स्फरद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे तुमचे आधार बँक लिंक नसल्यास तुम्हाला हा निधी देण्यात येणार नाही.Ration Card Subsidy Maharashtra 2024
अर्ज नमुना pdf डाऊनलोड करण्यासाठी – क्लिक करा
या योजनेचा GR पाहण्यासाठी – क्लिक करा
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठी – क्लिक करा