Central Bank Recruitement 2024 सेन्ट्रल बँक अंतर्गत निघालेल्या नोकर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मुदतवाढ देण्यात आली आहे.10 वी पास साठी सरकारी नोकरी आणि तीही बँकेत असल्याने या भरतीसाठी अनेक उमेदवारांनी उत्सुर्फ प्रतिसाद दिल्याने या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ केल्याचे सांगण्यात आले आहे.
मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत संपूर्ण देशभरात दहावी पास उमेदवार यांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 जानेवारी 2024 पर्यंतचे अंतिम मुदत देण्यात आली होती परंतु आता या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत असणार आहे.
Central Bank Bharti 2024 Notification
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया 24 डिसेंबर 2023 पासून राबविण्यात आली होती या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते आणि त्यानुसार संपूर्ण देशातील उमेदवारांनी या भरतीसाठी उदंड प्रतिसाद देऊन अर्ज केलेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता कमी असल्याने आणि सरकारी बँकेत नोकरीच्या संधी असल्याने अनेक उमेदवार हे या भरतीचा अर्ज करण्यापासून प्रलंबित राहिले तसेच अनेक ठिकाणी साईट डाऊन, सर्वर एरर यांसारख्या अडचणींमुळे उमेदवारांना अर्ज करता आला नाही अशा सर्व उमेदवारांसाठी आता पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन ची लिंक सुरू करण्यात आली असून 16 जानेवारी 2024 पर्यंत उमेदवार आपला अर्ज करू शकणार आहेत.
भरतीचे नाव | सेन्ट्रल बँक भरती 2024 |
विभाग | सरकारी बँक नोकरी |
पदसंख्या | 484 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
मित्रांनो 16 जानेवारी 2024 नंतर या भरतीसाठी तुम्हाला अर्थ करता येणार नाहीत कारण पुन्हा या भरतीसाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही याबद्दल सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे.
Central Bank Jobs Recruitement 2024
शैक्षणिक पात्रता –
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा मंडळातून 10 वी पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 वर्षे ते 26 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
- ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
- एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी ₹850 शुल्क असणार आहे.
- मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 175 शुल्क असणार आहे.
महत्वाच्या तारखा –
- अर्ज करण्यास सुरुवात तारीख 24 डिसेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- ओळखीचा पुरावा
- 10 वी पास निकाल
- जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल
- कास्ट व्हॅलेडीटी
Central Bank Bharti 2024 Apply Online
या भरतीचा अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
जिल्हा बँक नोकरभरती अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
१.या भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत.
२.अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत.
३.अर्ज करत असताना सदरील पदासाठी लागणारी पात्रता तपासूनच अर्ज करावा.
४.अर्ज करत असताना विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज अपात्र ठरविला जाईल.
५.संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट करण्याआधी व्यवस्थित तपासून घ्यावी.
६.अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी.
७.परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही याची नोंद अर्ज करताना घ्यावी.
८.आपला चालू मोबाईल नंबर आणि इमेल आयडी च फॉर्म मध्ये देयचा आहे जेणेकरून आपल्याला पुढील सर्व अपडेट्स मोबाईल नंबर वर आणि इमेल वरच येणार आहेत
९.परीक्षा शुल्क हे न परतावा असते म्हणजे उद्या जरी तुमचा फॉर्म हा काही कारणास्तव अपात्र ठरला तरी तुम्हाला शुल्क परत मिळणार नाही.
१०.एकदा सबमिट केल्यानंतर अर्ज हा पुन्हा एडीट करता येणार नाही त्यामुळे अर्ज सबमिट करण्या आधी व्यवस्थित तपासून पहावा सर्व माहिती एकदा-दोनदा तपासावी आणि मगच तुमचा अर्ज हा सबमिट करावा.Central Bank Recruitement 2024