Pm Kisan 17 Installment List देशभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाच्या तोंडावरच आनंदाची बातमी समोर आली आहे कारण पी एम किसान या योजनेचा सतरावा हप्ता देशातील सुमारे नऊ कोटी तर महाराष्ट्र राज्यातून सुमारे ९० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी जमा होणार आहे.
Pm Kisan Samman Yojana Marathi
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेअंतर्गत आजवर संपूर्ण देशभरातून 09 कोटी शेतकऱ्यांना 16 हप्ते प्रत्येकी 2000 रुपयाप्रमाणे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर सर्वात पहिला निर्णय हा देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी घेऊन पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणाच्या फाईलवर सही करून या हप्त्यासाठी संबंधित रक्कम देखील वितरित करण्यात आली आहे.
आणि यामुळेच उद्या 18 जून 2024 ला वाराणसी मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात या हप्त्याचे वितरण देखील शेतकऱ्यांसाठी करण्यात येणार आहे. आता या हप्त्याची लाभार्थी यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रत्येक गावाची यादी पाहता येणार आहे तसेच स्वतःचा देखील रजिस्ट्रेशन आयडी टाकून बेनिफिशियल स्टेटस बघून हप्ता मिळणार का नाही हे शेतकरी पाहू शकणार आहे.
Pm Kisan Yojana 17 installment Beneficiery List
पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केली आहे त्याच बँक खात्यात जमा होणार आहे. अनेकदा जे बँक खाते तुम्ही सर्वात पहिल्यांदा उघडले होते त्याच बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक केलेले असते परंतु काही वेळा ते बँक ते खूप जुनी असल्याने शेतकऱ्यांनी बँक खाते देखील बंद केलेले असते अशावेळी तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेले बँक खाते कोणते आहे हे पाहू शकता यासाठी खाली तुम्हाला लिंक देण्यात आली आहे.
अथवा तुम्हाला दुसरे बँक खाते तुमच्या आधार कार्ड ची लिंक करायचे असल्यास संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन तुम्हाला तुमचे बँक खाते आधार एनपीसीआयला लिंक करण्यास संबंधित बँकेच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सांगायचे आहे यावर अजून एक सोप्पा असलेला पर्याय म्हणजे तुम्ही पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्टात जाऊन तुमचे खाते उघडू शकणार आहात कारण पोस्टात उघडलेले खाते तुमच्या आधार कार्डला थेट लिंक केलेले असते.आणि त्यामुळे पुढील सर्व हफ्ते तुमचे पोस्टात जमा होतील.Pm Kisan 17 Installment List