Maharashtra Kanyadan Yojana 2024 मुलींच्या लग्नासाठी लागणारा अवाढव्य खर्च करण्यासाठी गरीब कुटुंबातील व पात्र असलेल्या सर्व लाभार्थी मुलींना कन्यादान या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते या योजनेच्या मिळणाऱ्या पूर्वीच्या लाभत देखील आता राज्य सरकारच्या वतीने वाढ करण्यात आली आहे आणि त्यामुळेच तुम्हीदेखील अजूनही या योजनेची कोणतीही माहिती घेतली नसल्यास आजच्या लेखा मध्ये तुम्हाला या योजनेबद्दल सर्व माहिती देण्यात आली आहे.
Kanyadan Yojana Maharashtra 2024
नमस्कार मित्रांनो सध्याच्या काळात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत परंतु या योजनांपैकी अनेक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे देखील लक्षात येत आहे कारण योजना बद्दलची माहिती सर्व लोकांना नसते आणि त्यामुळे या लाभापासून जे पात्र लाभार्थी आहेत तेच वंचित राहतात असे दिसत आहे या योजनांमधील एक योजना म्हणजे राज्य सरकार द्वारे राबविण्यात येणारी कन्यादान योजना या योजनेची देखील माहिती अनेक नागरिकांना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय आहे कन्यादान योजना ?
कन्यादान योजनेच्या माध्यमातून संबंधित लाभार्थींना मुलीच्या विवाह साठी एक विशिष्ट रक्कम दिली जाते पूर्वी 2023 पर्यंत ही रक्कम 10 हजार रुपये एवढी दिली जायची परंतु महायुती सरकारने यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करून आता कन्यादान योजनेच्या मार्फत २५००० रुपये रक्कम मुलीच्या लग्नासाठी सरकार द्वारे दिली जाते आणि या रकमेचा फायदा गरीब कुटुंबातील लग्न असलेल्या मुलींसाठी नक्कीच होतो. रक्कम वाढवण्यात आल्यामुळे चांगल्या प्रमाणात लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी एक रक्कम पैसे हे लाभार्थी मुलींना लग्नाच्या वेळी दिले जातात.
Kanyadan Yojna Apply Online Link
कन्यादान योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
कन्यादान योजनेसाठी लाभ घेण्याकरिता संबंधित मुलीचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्यांमधील रहिवासी असणे आवश्यक असणार आहे तसेच ही योजना कमी उत्पन्न असलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या परिवारासाठीच असल्याकारणाने यामध्ये तुमची पात्रता पासून मगच तुम्हाला योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत आणि याचे अर्ज तुम्ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा प्रशासन यांच्याकडे किंवा तालुका प्रशासन यांच्याकडे करू शकणार आहात.
कन्यादान योजनेसाठी आवश्यक असणारे पात्रता व निकष खालील प्रमाणे असणार आहेत –
- लाभ घेणारे वधू व वर महाराष्ट्रातील रहिवासी असावे.
- नवदांपत्यापैकी एक जण हे अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- वराचे वय 21 वर्ष वधूचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले असावे
- प्रथम हे अनुदान देण्यात येणार आहे बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याअंतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा दोनही कुटुंबाच्या वतीने कोणत्याही प्रकारे उल्लंघन झाले नसल्याचे प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला सादर करावे लागणार आहे.
- यानंतर शहानिशा करून तुम्हाला या योजनेसाठी लाभ देण्यात येणार आहे.Maharashtra Kanyadan Yojana 2024
आवश्यक कागदपत्रे –
- आवेदन अर्ज
- अर्जदाराचे आधार कार्ड
- दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- वर वधूचे ओळखपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्न प्रमाणपत्र
- हमीपत्र

- DRDO महाराष्ट्र अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 37 हजार महिना | DRDO Maharashtra Bharti 2025
- स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 65 हजार | SBI Mumbai Bharti 2025
- पुणे महानगरपालिका मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Pune Mahapalika Bharti 2025
- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण विभाग अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 20 हजार | MAT Mumbai Bharti 2025
- वन विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 50 हजार | Van Vibhag Chandrapur Bharti 2025