Mazi Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्याचा राज्य सरकार द्वारे अंतिम अर्थसंकल्प आज प्रसिद्ध करण्यात आला आणि या अर्थसंकल्पामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही जाहीर करण्यात आली आहे आणि या योजनेद्वारे राज्यभरातून सुमारे 2.5 कोटी महिलांना महिन्याला 1500 रुपये बँक खात्यावर दिले जाणार आहेत. या योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna Notification
मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार द्वारे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सुमारे 2.5 कोटी महिलांना महिन्याला थेट बँक खात्यावर 1500 रुपये दिले जाणार आहेत याबाबत मध्यस्थी देखील नसणार आहे आणि लाभार्थी महिलांना ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. आणि यामुळेच ही योजना महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पातील अत्यंत महत्त्वाच्या योजनेमध्ये एक असणार आहे.
Mazi Ladki Bahin Yojna Registration
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अटी व पात्रता –
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अटी व पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना १५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत
- यामध्ये लाभार्थी महिला 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यकता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत
हेही वाचा : राज्यातील मुलींना लग्नासाठी मिळणार 20 हजार रुपये कन्यादान योजना माहिती पहा
या योजनेच्या निधीबद्दल बोलायचे झाल्यास उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेच्या एक वर्षासाठी राज्य सरकार द्वारे तब्बल 46 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी बद्दल अद्याप अधिकृतपणे माहिती उपलब्ध झाली नसल्याने याबद्दल तुम्हाला सांगता येणार नाही कारण ऑनलाईन नोंदणी करायची की ऑफलाईन नोंदणी अथवा डेटाबेस कोणत्या पद्धतीने स्वीकारला जाणार आहे याबद्दल अद्याप शासन निर्णय प्रसिद्ध न झाल्यामुळे माहिती देता येणार नाही परंतु अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सांगण्यानुसार येथे काही दिवसातच या योजनेचा अधिकृतपणे शासन निर्णय देखील तुमच्यासमोर येणार आहे.Mazi Ladki Bahin Yojana