Annapurna Yojana Apply Online महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे विधानसभा इलेक्शन पूर्वी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्या योजनेची संलग्न मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या दोन योजनांचा महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी तसेच उज्वला गॅस योजना धारक बहिणी यांनी घेण्याची आवाहन महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे अनेक दिवसांपासून केले गेले आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नक्की काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तसेच मोफत गॅस सिलेंडर कसे मिळवायचे याबाबतची माहिती आपण आज सविस्तर पाहणार आहोत. ही माहिती सविस्तर पहा आणि अशाच योजना आणि सरकारी नोकर भरती माहितीसाठी दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक वर क्लिक करून आपला ग्रुप देखील नक्की जॉईन करा.
Annapurna Gas Yojana Maharashtra 2025
मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत राज्य सरकार द्वारे लाडकी बहीण योजना धारक महिलांना आणि त्यासोबतच उज्वला गॅस योजना या योजनाच्या पात्र असणाऱ्या महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा राज्य सरकार द्वारे निर्णय घेतला गेला होता.
या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू होऊन यामध्ये ज्या महिला पात्र ठरल्या त्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरची सबसिडी देखील आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर जमा झाली. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कुठल्याही प्रकारे तुम्हाला अर्ज करावा लागत नाही यासाठी फक्त खालील अटींची अथवा निकषांची पूर्तता करणे तुम्ही अनिवार्य असणार आहे निकषांमध्ये पात्र असल्यास तुम्हाला देखील योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Mukhyamantri Annapurna Yojana 2025 Application
अन्नपूर्णा योजना लाभ घेण्यासाठी खालील निकष असणार आहेत –
- लाभ घेण्यासाठी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अथवा उज्वला गॅस योजना लाभार्थी असावी.
- गॅस सिलेंडरचे कलेक्शन हे लाभार्थी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिलेच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे आवश्यक असणार आहे.
- यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
- वर्षातून तीन गॅस सिलेंडरचे अनुदान बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
- यासाठी कोणत्याही कंपनीचा सिलेंडर असले तरी देखील चालणार आहे.Annapurna Yojana Apply Online
