10वी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट 📲 ऑनलाईन अर्जप्रक्रिया | Free Tablet Yojana 2025

Free Tablet Yojana 2025 मित्रांनो तुम्ही अथवा तुमच्या परिवारातील मित्रांपैकी कोणीही 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेला असल्यास त्यांच्यासाठी महाज्योतीमार्फत पुढील परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्यासाठीच इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि त्यासोबतच प्रत्येक दिवशी 6 GB इंटरनेट डेटा देखील पुरवण्यात येतो.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहावीचा निकाल लागल्यानंतर या योजनेसाठी महा ज्योती द्वारे जाहिरात प्रसिद्ध अथवा निवेदन प्रकाशित करण्यात आलेले असून यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे अर्ज करण्यास कोणत्याही प्रकारचे शुल्क नसणार आहे आणि त्यासोबतच यामध्ये कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही. सदरील योजनेचा अर्ज करण्यासाठीची लिंक अधिकृत जाहिरात आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mahajyoti Free Tablet 2025 Pdf

मित्रांनो सदरील योजनेचा अर्ज करण्यासाठी अथवा टॅबलेट घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतात अथवा नोंदणी करावी लागते यासाठी काही पात्रता व अटी आहेत त्यांची पूर्तता करणे अनिवार्य असणार आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladki Bahin May Hafta Date लाडकी बहिण योजना पैसे जमा न झाल्यास करावे लागणार हे काम | Ladki Bahin May Hafta Date

फ्री टॅबलेट लाभ घेण्यासाठी पात्रता :

  • अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थी विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्ग त्यासोबतच नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा.
  • विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
  • विद्यार्थ्यांची निवड ही दहावी परीक्षेमध्ये मिळालेल्या टक्केवारीवर त्यासोबतच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणा नुसार करण्यात येणार आहे.

Mahajyoti Free Tablet Yojana 2025 Documents

फ्री टॅबलेट लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • दहावी पास प्रमाणपत्र अथवा गुणपत्रिका
  • दिव्यांग असल्यास संदर्भातील दाखला
  • अनाथ असल्यास संदर्भातील दाखला
  • इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश केल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट

Mahajyoti Free Tablet Yojana 2025 Last Date

मित्रांनो सदरील अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिनांक 31/05/2025 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. सदरील अर्ज मध्ये पोस्टाद्वारे अथवा ईमेलद्वारे अर्ज केल्यास ते अर्ज ग्राह्य धरलेला नाहीत यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे लागणार आहेत. आणि अर्ज करत असताना सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन केलेले असावेत. यामध्ये निवड प्रक्रियेबद्दल सर्व अधिकार संबंधित विभागाकडे राहणार आहेत.Free Tablet Yojana 2025

हे पण वाचा:
SSC Result Link 2025 दहावीचा निकाल लागला रे..94.10% कोकण विभागाची मज्जल असा पहा निकाल | SSC Result Link 2025
Mahajyoti Free Tablet Yojana 2025 Apply Link

0712-2870120/21 सदरली योजनेचा अर्ज करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास तुम्ही महा ज्योतीच्या या कॉल सेंटर नंबर वर कॉल करून सर्व माहिती घेऊ शकणार आहात. योजनेसाठी लवकरात लवकर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत आणि या फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घ्यायचा आहे याची अर्ज करण्याची लिंक त्यासोबतच अधिकृत जाहिरात खाली देण्यात आलेली आहे.

महाज्योती योजना जाहिरात पाहण्यासाठीक्लिक करा
महाज्योती योजना अर्ज करण्यासाठीक्लिक करा
महाज्योती योजना अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
Free Tablet Yojana 2025