HDFC Scholarship Yojana 2024 एचडीएफसी बँकेच्या वतीने इयत्ता पहिली पासून ते अगदी पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिकणाऱ्या उमेदवारांना 75 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही देखील या योजनेचा आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यास इच्छुक असल्यास लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही तुमचे अर्ज सबमिट करायचे आहेत. या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारे सर्व पात्रता, निकष आणि याबद्दलची सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
HDFC Scholarship Yojana आवश्यक पात्रता :
- स्कॉलरशिप फक्त भारतीय नागरिकत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.
- पहिली ते बारावी पर्यंत आणि बारावी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत.
- अर्ज करण्यासाठी अर्जदाराला मागील शैक्षणिक वर्षांमध्ये किमान 55 टक्के गुण मिळालेले असावे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 02.50 लाखांपेक्षा कमी असावे.
- शैक्षणिक शुल्का मध्ये सूट देण्यासाठी एचडीएफसी बँकेकडून ही स्कॉलरशिप योजना राबवली जात आहे.
HDFC Scholarship Yojana 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया व मुदत :
यामध्ये अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यातून निवड होऊन 75 हजार रुपयांपर्यंतच्या स्कॉलरशिप साठी विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. 2023-24 या शैक्षणिक वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये तब्बल 7684 विद्यार्थ्यांना एचडीएफसी द्वारे या स्कॉलरशिप योजनेसाठी लाभ देण्यात आला होता.
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडे 04 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे आणि त्यामुळे तुम्ही देखील इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुम्ही तुमचे अर्ज खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सबमिट करणे अनिवार्य आहे.
स्कॉलरशिप योजना जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
स्कॉलरशिप योजना अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |