Indapur Drone News बारामती, इंदापूर, दौंड इत्यादी तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून ड्रोन कॅमेरा ने धुमाकूळ घातलेला आहे या ड्रोन कॅमेरा मुळे नागरिकांमध्ये देखील भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे आणि यामुळेच संपूर्ण परिसरातील नागरिक रात्र रात्र जागून पहारा देत असल्याचे अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे.
बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या निंबोडी व लाकडी या गावांमध्ये देखील मागील काही दिवसांपासून रात्री ९ ते 12 च्या सुमारास अनेक ड्रोन्स पाहायला मिळत आहेत या ड्रोन कॅमेरा मुळे चोरीची भीती संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.
निंबोडी गावात एकाच वेळी दिसले ५ ड्रोन्स
दिनांक 14 जून 2024 रोजी रात्री साधारणपणे नऊच्या सुमारास निंबोडी गावामध्ये घोळवेवस्ती आणि डोईफोडे वस्ती या ठिकाणी एकाच वेळी ५-६ ड्रोन्स दिसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. गावांमधील तरुणांनी या ड्रोन्सचा पाठलाग किंवा जवळून पाहिले असता हे सर्व शिकावू विमान नसून ड्रोन्स कॅमेरे असल्याचेच सांगण्यात येत आहे. याबाबत अनेकदा ही शिकाऊ विमान असल्याचेच सांगण्यात येत आहे.
हे ड्रोन कॅमेरे सतत घरांच्या वरती गिरड्या घालत असल्याचे पाहायला मिळत आहे तसेच शिकाऊ विमान असल्यास ते एकाच ठिकाणी का थांबेल असा देखील प्रश्न स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे या ड्रोन्समुळे सर्व परिसरात नागरिकांमध्ये अतिशय भीतीदायक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ड्रोन्स कॅमेरे मधून संबंधित परिसराची चाचणी चोर करत असल्याची देखील चर्चा होत आहे आणि जे घर बंद आहेत किंवा नागरिक झोपले आहेत अशा ठिकाणी चोरी होणार अशा देखील चर्चा सर्वत्र रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
निंबोडी गावात काही दिवसांपूर्वी झाली चोरी
हे ड्रोन कॅमेरे फिरल्यानंतर चोरी होते का असा देखील प्रश्न अनेकांमध्ये निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे परंतु निंबोडी गावांमध्ये मागील काही दिवसांपूर्वी बाबासो खाडे यांच्या घरी अगदी भर दुपारी 12 वाजता घर फोडून चोरी झाल्याचे पाहायला मिळाले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये केवळ १५ मिनिटांमध्ये चोरी करून चोर परत गेल्याचे देखील दिसत आहे आणि यामुळेच सुरुवातीला ड्रोन फिरवून सर्व माहिती घेऊन त्यानंतर चोरी होत आहे अशी देखील चर्चा सर्वत्र पसरली असल्याने सर्व नागरिक भयभीत आहेत.
गेले दोन-तीन दिवसांपासून परिसरामध्ये पाऊस बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा ड्रोन्सचे जाळे दिसत आहे. 14 व 15 जून 2024 ला रात्री निंबोडी मधील घोळवेवस्ती आणि संबंधितच्या परिसरात हे ड्रोन पुन्हा एकदा फिरत आहेत. युवकांनी अगदी जवळून हे ड्रोन असल्याचीच खात्री केली आहे आणि अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये याचे फोटो आणि व्हिडिओ देखील शूट केलेले आहेत अजून किती दिवस लोकांना असेच भयभीत करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या परिस्थितीमुळे संबंधित परिसरातील सर्व लोक रात्र रात्र जागून काढत आहेत आणि सतर्कतेचे आवाहन देखील करत आहेत. Indapur Drone News