अभिमानास्पद..घरगुती मसाल्यांचा कॅन्सरवर उपचार होणार IIT मद्रासच्या संशोधकांचे पेटंट रजिस्टर | Indian Spices Cancer Treatment

Indian Spices Cancer Treatment मित्रांनो जगभरात ज्या रोगाचे नाव ऐकताच सर्वांना धडकी भरते असा आजार म्हणजेच कर्करोग किंवा कॅन्सर. रोज अनेक नागरिक या रोगाच्या प्रभावामुळे आपला जीव गमावत असतात अनेकदा या आजारांवर वेगवेगळे उपचार देखील शोधले जातात परंतु तरीदेखील पाहिजे असा फायदा मिळत नाही.

परंतु आयआयटी मद्रासच्या संशोधकांकडून आता एक सुखद बातमी समोर येत आहे आपल्या भारतीय नागरिकांच्या जीवनात रोज वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचा वापर करून कॅन्सरवर रामबाण औषध बनवण्याचा आयआयटी मद्रासचा पेटंट रजिस्टर झाला आहे. आणि यामुळे एक आशेचा किरण तयार झाला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Cancer Home Remedies Treatment

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास मध्ये संशोधकांनी भारतीय मसाल्याच्या वापराचे आता पेटंट घेतल्याची बातमी समोर येत आहे. या संशोधकांच्या म्हणण्यानुसार कर्करोगासारख्या प्राणघातक आजारावर उपचार करण्यासाठी भारतीय मसाल्यांचे औषध या औषधांचे गुणधर्म ओळखून औषधी वनस्पतींचा वापर करून कर्करोगावर 2027 ते 2028 पर्यंत औषध बाजारात आणण्यात येईल.

मित्रांनो भारतीय मसाल्यापासून तयार केलेल्या या नॅनो मेडिसिन मध्ये फुफ्फुस, आतडे, स्तन, ग्रीवा आणि थायरॉईड पेशंटच्या विरुद्ध कर्करोग विरोधी कृती दिसून आली आहे. हे औषध सामान्य पेशींसाठी देखील सुरक्षित असल्याचे दिसून आल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

या औषधाच्या सुरक्षा आणि किंमतीची समस्या सोडवण्यावर सध्या आयआयटीचे संशोधक काम करत आहेत. हे औषध बाजारात आल्यास याची किंमत काय असणार याबाबत देखील मोठे आवाहन संशोधकांसमोर असणार आहे परंतु भारतीय मसाल्यांपासून बनवलेल्या या औषधाचा कर्करोग असणाऱ्या पेशंट वर चांगलाच प्रभाव दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

Indian Spices Uses on Cancer

मित्रांनो भारतीय मसाल्याच्या तेलांचे औषधी फायदे हे फार पूर्वीपासून सर्वांना माहिती आहे सध्याच्या काळात जैव उपलब्धतेमुळे भारतीय मसाल्यांचा वापर कमी प्रमाणात झाला आहे आयआयटी मद्रास येथील रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक आर. नागराजन यांच्या सांगण्यानुसार कर्करोगाच्या पेशी सक्रिय घटक आणि त्यांच्या परस्पर संवादाच्या पद्धती ओळखण्यासाठी यांत्रिकी जो अभ्यास झाला तो अत्यंत महत्त्वाचा ठरला.

अनेक प्रयोगशाळांमध्ये त्याबद्दलचा अभ्यास अजूनही सुरू असल्याने त्यांनी सांगितले समांतर पद्धतीने आम्ही प्राण्यांच्या अभ्यासातील सकारात्मक परिणामांना क्लीनिकल चाचण्यांमधून परावर्तित करण्यास उत्सुक आहोत आणि येत्या दोन ते तीन वर्षात हे औषध आम्ही बाजारात देखील आलो असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Indian Spices Cancer Treatment

पेटंट करण्यात आलेल्या कॅन्सर विरोधी ज्ञानो फॉर्म्युलेशनचा प्राण्यांमध्ये अभ्यास करण्यात आला आहे आयआयटी मद्रासच्या मुख्य वैज्ञानिक अधिकारी एम. जॉयस निर्मला यांनी सांगितले की पेटंट केलेले भारतीय मसाले यांच्यावर आधारित न्यानोफोर्मिनेशन औषध अभ्यासाद्वारे कर्करोगाच्या अनेक सामान्य प्रकारांमध्ये हे औषध प्रभावी असल्याचे सिद्ध देखील झाले आहे.Indian Spices Cancer Treatment