JSW Udaan Scholarship नमस्कार मित्रांनो जे एस डब्ल्यू फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जात आहे आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन पद्धतीनेच या स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यामध्ये अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आवश्यक नाही आणि मुलगा आणि मुलगी दोघेही या स्कॉलरशिप साठी आपले अर्ज करू शकणार आहेत.
योजनेचा उद्देशच आहे अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन करणे आणि त्यांना आर्थिक मदत देणे आणि त्यामुळेच तुम्ही देखील या स्कॉलरशिप योजनेसाठी लवकरात लवकर तुमचे अर्ज करायचे आहेत कारण अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 05 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
JSW Udaan Scholarship Notification 2024
JSW उडान स्कॉलरशिप अंतर्गत प्रथम मोर्चा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 ते 50 हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाते आणि यामध्ये या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही.
स्कॉलरशिप अथवा शिष्यवृत्ती योजनेसाठी खालील प्रमाणे स्वरूप असणार आहे. इंजीनियरिंग साठी पन्नास हजार रुपये पदवीधरांना तीस हजार रुपये पदव्युत्तर पदवीधरांसाठी तीस हजार रुपये मेडिकल क्षेत्रासाठी 50000 रुपये डिप्लोमा साठी दहा हजार रुपये इतर प्रोफेशनल डिग्री कोर्स साठी 25000 रुपये याप्रमाणे स्कॉलरशिप उमेदवारांना दिली जाणार आहे.
JSW Udaan Scholarship 2024 Apply Online
या शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये :
- प्रथम वर्षात शिकणाऱ्या डिप्लोमा, डिग्री अथवा इतर कोणताही कोर्स सुरू असावा.
- मुलं आणि मुली दोघेही लाभ घेऊ शकतात.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या अथवा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 08 लाखांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे.
- मागील शैक्षणिक वर्षांमध्ये उमेदवारांना किमान 60% गुण मिळालेले असणे देखील आवश्यक असणार आहे.JSW Udaan Scholarship 2024
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- बँकेचे पासबुक झेरॉक्स
- चालू वर्षाची ऍडमिशन पावती अथवा कॉलेजचे बोनाफाईड
JSW उडान स्कॉलरशिप अर्ज करण्यासाठी – क्लिक करा
इतर महत्वाच्या स्कॉलरशिप –
SBI तर्फे मिळत आहे 15 हजार ते 02 लाखांपर्यंत स्कॉलरशिप अर्ज सुरु | SBIF Asha Scholarship Marathi
HDFC Scholarship Yojana 2024 : एचडीएफसी बँक कडून 75 हजारांची स्कॉलरशिप 01ली ते पदवीधरांना संधी
कोटक कन्या स्कॉलरशिप अंतर्गत मुलींना मिळत आहे १ लाख 50 हजार रुपये | Kotak Kanya Scholership 2024