महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग भरती 4थी,10वी पास ते पदवीधर सर्वाना सरकारी नोकरी | Karagruh Vibhag Bharti 2024

Karagruh Vibhag Bharti 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी 2024 मधील सर्वात मोठी व महत्त्वाची भरती म्हणजेच महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग भरती 2024. कारण या भरतीमध्ये विविध विभागातील पदांसाठीची भरती केली जाणार आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये चौथी पास पासून ते दहावी पास, बारावी पास आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीच्या आणि तेही चांगल्या पगाराच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत.

Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024

राज्य कारागृह विभाग भरती अंतर्गत गट क मधील विविध जागांची भरती केली जाणार आहे महाराष्ट्र शासन कारागृह विभागामध्ये निघालेल्या भरतीसाठी उमेदवारांना 21 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्यासाठी शुल्क, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती देखील खाली सविस्तर पद्धतीने देण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो या भरतीमध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, शिक्षक, मिश्रक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ताना कार, बेकरी निदेशक, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटिंग, करवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालिचा निदेशक, ब्रेल लिपी निदेशक, जोडारी, प्रिपरेटरी, मिलिंग पर्यवेक्षक, शारीरिक कवायत निदेशक, शारीरिक शिक्षक निदेशक या पदांसाठीच्या जागांची भरती केली जाणार आहे.

एकूण 255 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्ही पात्र व इच्छुक असल्यास ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज करू शकणार आहात या भरतीचा अर्ज करण्यासाठी 23 जानेवारी 2024 पर्यंत उमेदवारांकडे अंतिम मुदत असणार आहे.

Karagruh Vibhag Recruitement 2024

  • लिपिक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील आणि कोणत्याही विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • वरिष्ठ लिपिक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील आणि कोणत्याही विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • लघुलेखक निम्न श्रेणी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हे दहावी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबतच उमेदवाराकडे मराठी व इंग्रजी टायपिंग चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • मिश्रक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हे दहावी पास असणे आवश्यक आहे यासोबतच बारावी, डी फार्म, बी फार्म उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
  • शिक्षक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हे डीएड असणे आवश्यक आहे.
  • शिवणकाम निदेशक पदासाठी उमेदवाराकडे दहावी पास किंवा आयटीआय सुतार काम आणि सोबत दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • सुतार काम निदेशक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हे दहावी पास त्यासोबतच आयटीआय सुतार काम आणि सोबत दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हे बारावी पास विज्ञान शाखेमधून आणि त्यासोबतच प्रशिक्षण घेतल्याचे एक वर्षाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • बेकरी निदेशक, तानाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक या सर्व पदांसाठी उमेदवार हे दहावी पास असणे त्यासोबत आयटीआय आणि संबंधित विषयात एक वर्षाचा कोर्स केलेला असणे अनिवार्य असणार आहे.
  • करवत्या पदासाठी अर्ज करण्याकरता उमेदवार हे चौथी पास असले तरी देखील अर्ज करू शकणार आहेत.
  • लोहारकाम निदेशक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हे दहावी पास असणे आवश्यक आहे त्यासोबतच आयटीआय आणि तीन वर्षाचा अनुभव.
  • कातारी पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हे दहावी पास असणे आवश्यक आहे आणि त्यासोबत तीन वर्षाचा अनुभव.
  • गृह पर्यवेक्षक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी पास तसेच पदविका प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

उर्वरित पदांसाठी देखील दहावी पास आणि संबंधित विषयातील आयटीआय उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे आणि मगच आपला अर्ज करायचा आहे.

वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 वर्षे ते 38 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
  • एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 900 शुल्क असणार आहे.

Karagruh Vibhag Bharti 2024 Apply Online

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 30 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Karagruh Vibhag Bharti 2024

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

वेतनश्रेणी – 20000 रु. ते 92,300 रु.महिना

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
गुप्तचर विभाग भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी गुप्तचर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

अर्थ करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.