Ladaki Bahin Yojana Installment Date मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या घडीला असणारी सर्वात महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेसाठीच आता तिसरा टप्पा देखील घोषित करण्यात आला असून या टप्प्यामध्ये महिलांच्या बँक खात्यावर 4500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून आता महिलांना रक्कम देखील थेट बँक खात्यावर मिळणार आहे.
मित्रांनो लाडकी बहीण योजना जुलै महिन्यामध्ये महिलांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि संपूर्ण जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेल्या महिलांना 17 ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यात अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा करण्यात आले.
Ladaki Bahin Yojana 3 Installment Date
पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज केले त्यापैकी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 31 ऑगस्ट पर्यंत 3000 रुपये जमा करण्यात आले. पहिल्या दोन्ही टप्प्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यासाठी पैसे कधी येणार तसेच किती येणार याबाबत महिला चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री यांनी धाराशिव मधील कार्यक्रमांमध्ये स्पष्टपणे लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची तारीख सांगितली आहे. तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्प्यांमध्ये उर्वरित सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 रुपये जमा करण्यात येणार असून हा टप्पा 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पार पडणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही अर्ज केला असल्यास आणि तुमचा अर्ज स्वीकारला असल्यास त्यासोबतच तुमचे आधार आणि बँक खाते लिंक असल्यास तुम्हाला या योजनेद्वारे लाभ मिळणार आहे.
Majhi Ladaki Bahin Yojana Online Apply
मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे कारण या योजनेमध्ये मागील काही दिवसांमध्ये अनेक वेगवेगळे आणि मोठे घोटाळे सरकारच्या निदर्शनास आल्याने संबंधित विभागाकडे सरकारने आदेश करून या योजनेसाठी आता केवळ ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे.
तुम्ही या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र असल्यास परंतु काही कारणास्तव तुम्ही तुमचा अर्ज अद्यापही केला नसल्यास तुम्ही तुमच्या जवळ अंगणवाडी सेविकांकडे जाऊ नका ऑफलाईन पद्धतीने तुमचा अर्ज जमा करू शकणार आहात आणि हा अर्ज जमा करण्यासाठी तुमच्याकडे येतात 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हत्याबाबत मुख्यमंत्री यांनी नक्की काय सांगितले याबद्दलची व्हिडिओ खाली देण्यात आली आहे ती व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहू शकता.Ladaki Bahin Yojana Installment Date
लाडकी बहिण योजना नवीन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा