Ladaki Bahin Yojana List मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून सुमारे 01 कोटी 08 लाख महिलांच्या बँक खात्यावर 17 ऑगस्ट पूर्वीच ३००० रुपये जमा करण्यात आले. यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित पैसे महिलांच्या बँक खात्यावर सोडण्यात आले. आणि यामुळेच राज्यभरातील सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले कारण रक्षाबंधनापूर्वीच महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम डीबीटी द्वारे जमा झाल्याने महिलांनी देखील या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले.
लाडकी बहिण योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या महिलांना देखील आता ही रक्कम जमा करण्यासाठी तारीख देखील फिक्स करण्यात आली आहे आणि त्यामुळेच उर्वरित महिलांच्या देखील बँक खात्यावर आता पैसे जमा होणार आहेत परंतु यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या बाबी तपासायच्या आहेत तरच तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Majhi Ladki Bahin Yojana Installment Date :
लाडकी बहीण योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये आता 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथील लाडकी बहीण कार्यक्रमा मधून सुमारे 45 ते 50 लाख महिलांच्या बँका खात्यावर 3000 रुपये जमा केले जाणार आहेत. हे पैसे कोणाला मिळणार याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये अर्ज केले होते परंतु त्यांचे अर्ज अप्रू होऊन आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसल्याने डीबीटी द्वारे पैसे ट्रान्सफर झाले नाहीत आणि आता त्या महिलांनी त्यांच्या बँकेत जाऊन त्यांचे आधार डीबीटी करून घेतल्याने अशा उर्वरित असलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. परंतु यासाठी तुम्ही तुमच्या बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे आणि डीबीटी साठी एनेबल असणे अत्यंत आवश्यक आहे.Ladaki Bahin Yojana List
Ladaki Bahin Yojana DBT Process :
ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेल्या महिलांना कधी मिळणार पैसे –
ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये आपले अर्ज केले आहेत अशा देखील महिलांच्या आता जवळपास छाननी पूर्ण झाली आहे आणि उर्वरित छाननी देखील जिल्हास्तरावर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही सर्व छाननी पूर्ण होऊन सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र ठरलेल्या आणि आधार कार्ड ला बँक लिंक असलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यावर एकाच दिवशी ४५०० रुपये जमा केले जाणार आहेत.
महिलांना यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही एनपीसीआयच्या वेबसाईटवर जाऊन तुमचे आधार आणि बँक एकमेकाची लिंक करून घेऊ शकता अथवा तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आधार मॅपिंग चा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही.Ladaki Bahin Yojana List