65 वर्षावरील नागरिकांना मिळणार 3000 रुपये मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज सुरु | Mukhyamantri Vayoshree Yojana 2024

Mukhyamantri Vayoshree Yojana 2024 मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता येणार असल्याने तुमच्या कुटुंबातील, मित्रपरिवारापैकी नागरिकांचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात. योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत कारण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा योजनेसाठी अद्याप उपलब्ध करून देण्यात आली नाही. सदरील योजनेसाठी आवश्यक असलेली पात्रता, अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया, यासोबतच शासन निर्णय, अर्जाची प्रत आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे ती तुम्ही व्यवस्थित पाहून अर्जाची प्रिंट करून हा अर्ज सबमिट करावा लागणार आहे. याबाबत सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Vayoshree Yojana Maharashtra 2024

महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिवेशनामध्ये विविध विभागातील आणि वयोमर्यादेमधील नागरिकांसाठी योजना राबवल्या गेल्या ज्यामध्ये लाडके बहीण योजना असेल अथवा लाडका भाऊ योजना त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्य सरकार द्वारे जाहीर करण्यात आली आणि तिची अंमलबजावणी देखील सुरू आहे. या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

योजनेच्या उद्देशाबद्दल बोलायचे झाल्यास ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानाने येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यासारख्या बाबींवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य किंवा साधने खरेदी करण्यासाठी राज्य सरकारच्या द्वारे एक वेळ एक रकमे 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या बँक खात्यावर थेट जमा केले जातात.

Mukhyamantri Vayoshree Yojana 2024 पात्रता

वयोश्री योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता –

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  • लाभार्थी नागरिकाचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

वयोश्री योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे –

  • लाभार्थी व्यक्तीचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • स्वयंघोषणापत्र
  • तसेच शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून ही कागदपत्रे समाज कल्याण विभाग तालुकास्तर अथवा जिल्हा स्तरावर जमा करणे आवश्यक असणार आहे कारण यासाठी अद्याप ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध नाही आणि केवळ ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.Mukhyamantri Vayoshree Yojana 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mukhyamantri Vayoshree Yojana 2024
वयोश्री योजना अर्ज डाऊनलोड करण्यासाठीक्लिक करा
वयोश्री योजना GR पाहण्यासाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा