राज्यातील सर्वात मोठा रोजगार मेळावा 6000 जागा ऑनलाईन अर्ज सुरु | Namo Maharojgar Melava 2024

Namo Maharojgar Melava 2024 राज्य सरकार द्वारे घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी नमो महारोजगार मेळावा द्वारे अनेक बेरोजगार युवक युवतींना रोजगार देण्यात येणार आहे. यामध्ये अगदी दहावी पास पासून ते आयटीआय पास, बारावी पास, डिप्लोमा पास, विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार, अभियंता, एमबीए यांसारख्या विविध विषयातून शिक्षण घेतलेले उमेदवार या मेळाव्याचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

सदरील मेळाव्याचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. मित्रांनो राज्य शासनाने सांगितल्याप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने नमो महा रोजगार मेळावा घेतले जाणार आहेत आणि ज्याद्वारे विविध क्षेत्रातील उमेदवारांना थेट नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

Namo Maharojgar Melava Thane

सदरील मेळाव्याद्वारे उमेदवारांना थेट कंपनीमध्ये खाजगी नोकरी मिळणार आहे यामध्ये विविध क्षेत्रातील जसे की माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी विभाग, इंडस्ट्रियल क्षेत्रात, कृषी क्षेत्रात आणि विविध क्षेत्रातील कंपन्या उमेदवारांना नोकरी देण्यासाठी मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता तपासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.

मुंबई व आसपासच्या भागातील उमेदवारांसाठी ठाणे मध्ये दिनांक 29 फेब्रुवारी 2024 व दिनांक 01 मार्च 2024 रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. आणि यामध्ये तब्बल 5900 उमेदवारांना थेट नोकरी दिली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

मेळावा जरी ऑफलाइन असला तरी देखील उमेदवारांना यासाठी आपले रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपली सर्व वैयक्तिक माहिती तसेच शैक्षणिक माहिती भरून आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

Namo Maharojgar Registration

भरतीचे नाव – नमो महारोजगार मेळावा, ठाणे 2024

विभाग – खाजगी नोकरी

पदसंख्या – 5900

पदांचे नाव – रिलेशनशिप मॅनेजर, फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग मॅनेजर, बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह, फिटर, वेल्डर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, टोल ऑपरेटर, कस्टमर सेल्स आणि इतरही अनेक पदे

शैक्षणिक पात्रता – पदानुसार दहावी पास ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य

निवड प्रक्रिया – थेट मुलाखती द्वारे निवड

अर्ज करणे शुल्क – नाही

मेळावा दिनांक – 29 फेब्रुवारी 2024 व 01 मार्च 2024

वेळ – सकाळी 10 ते सायंकाळी 06 वाजेपर्यंत

मेळावा ठिकाण – हायलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम)

Namo Maharojgar Melava Thane Registration

सदरील मेळाव्यासाठी उमेदवारांनी दिनांक 29 फेब्रुवारी 2024 व दिनांक 01 मार्च 2024 रोजी दिलेल्या ठिकाणी आपल्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.

उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे केली जाणार आहे.

या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असणार आहे.

मुलाखती विविध उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.

Namo Maharojgar Melava 2024

कागदपत्रांची छाननी करून चुकीचे कागदपत्र असणाऱ्या उमेदवारांना बाद केले जाणार आहे.

हा मेळावा संपूर्णपणे राज्य शासनाद्वारे घेतल्या जाणार असल्याने कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.

मेळाव्याचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
मेळाव्याची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
IDBI बँक भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा