PM Internship Yojana 2025 Marathi देशभरातील बेरोजगार युवकांसाठी केंद्र सरकार द्वारे पीएम इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली असून या योजनेद्वारे सर्व बेरोजगार युवक युवतींना महिन्याला 5000 रुपये दिले जाणार आहेत. यामध्ये दहावी पास, बारावी पास, आयटीआय, डिप्लोमा पास, अभियंता पदवीधर तसेच विविध क्षेत्रातील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवार देखील या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहेत.
सदरील योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक असणार आहे आणि या नोंदणीसाठी पूर्वी 31 मार्च 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली होती परंतु केंद्र सरकार द्वारे ही मुदत वाढ करण्यात आली असून आता 15 एप्रिल 2025 आधी तुम्ही सदरील पीएम इंटर्नशिप या योजनेसाठी तुमची मोफत नोंदणी करू शकता.Pm Internship scheme 2025
PM Internship Yojana 2025 Apply Online
तर मित्रांनो पीएम इंटर्नशिप योजना अंतर्गत केंद्र सरकार द्वारे 4500 रुपये आणि तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये अथवा कंपनीमध्ये काम करणार आहे त्या कंपनीद्वारे तुम्हाला 500 रुपये असे महिन्याला पाच हजार रुपये दिले जाणार असल्याने बेरोजगारांसाठी ही एक सर्वात महत्त्वाची आणि चांगली योजना असणार आहे.
यामध्ये देशातील नावाजलेल्या रिलायन्स, टाटा, जिओ, महिंद्रा, अदानी, बजाज यांसारख्या विविध विभागातील आणि विविध क्षेत्रातील कंपन्या असणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला ही इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे आणि पूर्ण झाल्यानंतर त्यामधून तुम्हाला सर्टिफिकेट देखील मिळणार आहे ज्याचा भविष्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर आणि चांगला लाभ घेता येणार आहे.PM Internship Yojana 2025 Marathi
PM Internship Yojana 2025 Marathi Application Process
तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत आणि या अर्ज करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शुल्क भरण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच अगदी घरबसल्या सदरील योजनेसाठी अर्ज करू शकता.यामध्ये अटी व निकषांची माहिती खाली देण्यात आलेली आहे.Pm Internship scheme 2025 Documents
- अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारतीय रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय 21 ते 24 वर्ष दरम्यान असावे.
- अर्जदार किमान मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असावा.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 08 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार करणाऱ्या उमेदवाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरी अथवा शासकीय कर्मचारी नसावी.
