पुणे महानगरपालिका मेगाभरती 10वी पास ते पदवीधर नोकरीच्या संधी | PMC Bharti 2024

PMC Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी पुणे महानगर पालिका अंतर्गत मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्थ करण्यासाठी 10 वी पास,12वी पास ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना पुणे महानगरपालिके अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाईट, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पदांची नावे याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे तुम्ही देखील या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Pune Mahanagarpalika Bharti 2024

मित्रांनो आरोग्य विभाग पुणे यांचे अंतर्गत पुणे महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यामधील वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर झालेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये अनेक रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ही सर्व पदे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खाते यांच्या नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे मुन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मध्ये खालील पदांची भरती होणार आहे.

पुणे महानगरपालिका च्या विविध विभागांमध्ये सदर भरती प्रक्रिया अंतर्गत 424 जागांची भरती केली जाणार आहे. आणि या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 16 जानेवारी 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर केले गेलेले सर्व अर्ज बाद केले जाणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, पूर्ण वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, ए एन एम या पदांसाठीच्या जागांची भरती केली जाणार आहे.

PMC Recruitement 2024 Apply Online

  • वैद्यकीय अधिकारी -120 जागा
  • स्टाफ नर्स – 124 जागा
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक – 120 जागा
  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 16 जागा
  • बालरोग तज्ञ – 12 जागा
  • स्त्री रोग तज्ञ – 12 जागा
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 05 जागा
  • स्टाफ नर्स – 09 जागा
  • ए एन एम – 06 जागा

अशा एकूण 424 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे या भरतीच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास विविध पदा नुसार शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळी असणार आहे. यामध्ये दहावी पास पासून, बारावी पास, विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 30 वर्षे ते 60 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
  • एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी ₹300 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 200 शुल्क असणार आहे.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 30 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024
PMC Bharti 2024

PMC Bharti 2024 Apply Online

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • 10 वी पास निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

वेतनश्रेणी – पदानुसार 20 हजार ते 75 हजार रु.महिना

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

१.या भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत.

२.अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत.

३.अर्ज करत असताना सदरील पदासाठी लागणारी पात्रता तपासूनच अर्ज करावा.

४.अर्ज करत असताना विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज अपात्र ठरविला जाईल.

५.संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट करण्याआधी व्यवस्थित तपासून घ्यावी.

६.अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी.

७.परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही याची नोंद अर्ज करताना घ्यावी.

८.आपला चालू मोबाईल नंबर आणि इमेल आयडी च फॉर्म मध्ये देयचा आहे जेणेकरून आपल्याला पुढील सर्व अपडेट्स मोबाईल नंबर वर आणि इमेल वरच येणार आहेत

९.परीक्षा शुल्क हे न परतावा असते म्हणजे उद्या जरी तुमचा फॉर्म हा काही कारणास्तव अपात्र ठरला तरी तुम्हाला शुल्क परत मिळणार नाही.

१०.एकदा सबमिट केल्यानंतर अर्ज हा पुन्हा एडीट करता येणार नाही त्यामुळे अर्ज सबमिट करण्या आधी व्यवस्थित तपासून पहावा सर्व माहिती एकदा-दोनदा तपासावी आणि मगच तुमचा अर्ज हा सबमिट करावा.