Aykar Vibhag Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी आयकर विभाग महाराष्ट्र (Income Tax Department Bharti 2024) अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी आहे आणि 10वी पास,12वी पास ते पदवीधर पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.
आयकर विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 19 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Income Tax Department Bharti Maharashtra
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट महाराष्ट्र राज्य म्हणजेच आयकर विभाग अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू झाली आहे. यामध्ये इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड 2, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट या पदांसाठीची भरती होणार आहे.
सदर पदांसाठी दहावी पास पासुन ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे अर्ज करण्यास सुरुवात झाली असून 19 जानेवारी 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत असणार आहे. त्यानंतर केले गेलेले सर्व अर्ज हे बाद केले जाणार आहेत.
भरतीचे नाव | आयकर विभाग भरती |
विभाग | आयकर विभाग महाराष्ट्र राज्य |
पदसंख्या | 291 |
नोकरीचे ठिकाण | मुंबई,महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आयकर विभाग महाराष्ट्र अंतर्गत होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये उपलब्ध झालेल्या विविध पदांसाठी पदनिहाय उपलब्ध जागा खालील प्रमाणे असणार आहेत.
Income Tax Department Recruitement 2024
पदनिहाय उपलब्ध जागा –
- इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पदासाठी एकूण 14 जागा भरल्या जाणार आहेत.
- स्टेनोग्राफर ग्रेड 2 या पदासाठी 18 जागांची भरती होणार आहे.
- कर सहाय्यक या पदाच्या 119 जागा भरल्या जाणार आहेत.
- मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 137 जागा भरल्या जाणार आहेत.
- कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी 03 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
- इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त मंडळातून पदवीधर प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.
- स्टेनोग्राफर पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा मंडळातून बारावी पास चे प्रमाणपत्र असणे तसेच स्टेनोग्राफर चा कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.
- कर सहाय्यक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त मंडळातून पदवीधर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- मल्टी टास्किंग स्टाफ पताचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा दहावी पास असणे आवश्यक आहे.
- कॅन्टीन अटेंडंट पदाचा अर्ज करण्यासाठी देखील उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरातीवर क्लिक करून सविस्तर माहिती पाहायची आहे आणि मगच संबंधित पदासाठी अर्ज करायचे आहेत.
वेतनश्रेणी –
- इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स 44,900 – 1,42,400 रु.महिना
- स्टेनोग्राफर 25,500 – 81,100 रु.महिना
- कर सहाय्यक 25,500 – 81,100 रु.महिना
- मल्टी टास्किंग स्टाफ 18,000 – 56,900 रु.महिना
- कॅन्टीन अटेंडंट 18,000 – 56,900 रु.महिना
Aykar Vibhag Recruitement 2024 Apply Online
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 वर्षे ते 30 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
- ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
- एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी ₹200 शुल्क असणार आहे.
- मागास व राखीव प्रवर्गासाठी शुल्क नाही.
महत्वाच्या तारखा –
- अर्ज करण्यास सुरुवात तारीख 01 जानेवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- ओळखीचा पुरावा
- शैक्षणिक निकाल
- जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल
- कास्ट व्हॅलेडीटी
या भरतीचा अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
राज्य कारागृह विभाग भरतीचा अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
या भरतीचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.
अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.
अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.Aykar Vibhag Bharti 2024