Ladki Bahin May Hafta Date नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर लवकरच जमा होणार आहे परंतु आता यामध्ये अनेक अशा महिला आहेत की ज्यांच्या बँक खात्यावर मागील काही महिन्यांपासून योजनेचे पैसे जमा झाले नाहीत आणि त्यामुळेच अनेक लाडक्या बहिणी चौकशी करत आहेत की आता आम्हाला योजनेचे पैसे परत चालू करण्यासाठी काय करावे लागणार त्याबद्दलची माहिती आपण आज पाहणार आहोत.
Ladki Bahin Maharashtra Next Installment
महाराष्ट्र सरकार द्वारे मागील वर्षी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यापर्यंत सर्व लाभार्थी व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर 1500 रुपयांप्रमाणे 10 हफ्ते जमा करण्यात आले आहेत.
आणि योजनेच्या पुढील हप्त्यासाठी म्हणजेच की मे महिन्याच्या हप्त्याचे देखील प्रक्रिया सुरू झाली असून ते देखील पैसे लवकरच लाडकी बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे.
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना ही कदापि बंद होणार नाही आणि योजनेसाठी सरकारकडे सक्षमीकरण आल्यास योजनेचा हप्ता देखील आम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे वाढणार देखील आहे.
Ladki Bahin Yojana Maharashtra
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील सर्व महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी महिला व बालविकास विभागाद्वारे सुरू करण्यात आली आणि या योजनेमुळे राज्यातील जवळपास 2.5 कोटी महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला योजनेचा लाभ 1500 रुपये जमा करण्यात येतात.
परंतु यामध्ये जानेवारी महिन्यापासून अथवा फेब्रुवारी महिन्यापासून काही महिलांच्या बँक खात्यावर योजनेचा हप्ता जमा झाला नसल्याचे महिलांकडून सांगण्यात येत आहे.
योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये बसूनही आम्हाला योजनेचा लाभ का मिळाला नाही अशी चौकशी महिला करत आहेत आता याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून त्यानुसार महिलांना यामध्ये काही अपडेट करावे लागणार आहे आणि ते अपडेट केल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ जमा होणार आहे.Ladki Bahin May Hafta Date
Ladki Bahin Yojana Beneficiery Status Check
लाडकी बहीण योजना हफ्ता जमा न झाल्यास करा हे काम :
लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे जमा होत नसल्या तुम्हाला सर्वात आधी ज्या बँक खात्याची तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुमचे आभार डीबीटी अथवा आधार सीडिंग आहे का नाही ते तपासावे लागणार आहे.
कारण ज्यावेळी वर्ष बदलते तेव्हा बँका अनेक खाते रिकेवायसीला आल्याने तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट द्यावे लागतात अन्यथा तुमचे बँक खाते इन ऍक्टिव्ह होऊन जाते आणि अशा खात्यामध्ये डीबीटी हा वर्ग करण्यात येत नाही आणि त्यामुळे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळत नाहीत. ही प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला पुढचे सर्व पैसे जमा होणार आहे.
