रेशनकार्ड धारकांना गिफ्ट या ६ वस्तू मिळणार आनंदाचा शिधा श्रीराम सोहळा | Anandacha Shidha 2024 Update

Anandacha Shidha 2024 Update राज्यातील सर्व नागरिकांसाठी खुशखबर समोर येत आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिधा मध्ये आता सहा वस्तू दिल्या जाणार आहेत. याबद्दल नुकतेच महाराष्ट्र राज्य अन्नपुरवठा विभागाकडून अपडेट देण्यात आली आहे आणि यामुळेच देशभरातील रेशन कार्डधारकांना याचा फायदा होणार आहे.

Anandacha Shidha Maharashtra 2024

मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांना आता रेशनिंग मध्ये आनंदाचा शिधा दिवाळीनंतर पुन्हा एकदा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा त्यासोबतच 19 फेब्रुवारी रोजी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नव्याने दिला जाणार आहे. आणि या आनंदाच्या शिधा मध्ये सहा वस्तूंचा समावेश केला जाणार आहे.

यामध्ये सर्व नागरिकांना साखर,खाद्यतेल, चणाडाळ, रवा,मैदा आणि पोहे यांसारख्या वस्तूंचा समावेश केला जाणार आहे. राज्यभरातील सुमारे 01.68 कोटी नागरिकांना म्हणजेच शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व प्रशासन विभागाच्या झालेल्या बैठकीमध्ये सर्व शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा देण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.

Anandacha Shidha Date 2024

महाराष्ट्र सरकारने 2023 मध्येच दिवाळीमध्ये तसेच गणेशोत्सवाला सर्व शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित केला होता. यामुळेच शिधापत्रिका धारकांना म्हणजेच रेशन कार्डधारकांना गहू, तांदूळ यासोबतच साखर, गोड तेल, चणाडाळ, रवा, मैदा व पोहे यांसारख्या वस्तूंचा समावेश करण्यात आला होता आणि त्यामुळेच याचा मोठ्या प्रमाणावर फायदा सर्व शिधापत्रिकाधारकांनी घेतला.

मित्रांनो सध्या संपूर्ण देशात आनंद आणि उत्सवाचे वातावरण आहे कारण 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मध्ये श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या सोहळ्याचे स्वागत जंगी करण्याचे संपूर्ण देशवासीयांना आवाहन करण्यात आले आहे पंतप्रधानांनी 22 जानेवारी 2024 ला देशातील सर्वच नागरिकांनी दिवाळी साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील अन्य योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक मध्ये छत्रपती संभाजी नगर, नागपूर व अमरावती भागातील जिल्हे तसेच वर्धा यांसारख्या जिल्ह्यातील चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना देखील एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल, एक किलो मैदा, एक किलो चणाडाळ, एक किलो पोहे या सहा वस्तूंचा समावेश असलेला संच आनंदाचा शिधा म्हणून दिला जाणार आहे.

Anandacha Shidha 2024 Update

Anandacha Shidha Marathi 2024

आनंदाचा शिधा एक संचासाठी शंभर रुपये किंमत असणार आहे तसेच आनंदाचा सुद्धा वितरण करण्यासाठी राज्य सरकारला सुमारे साडेपाचशे कोटी रुपये अंदाजे लागणार असल्याचे देखील मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आले आहे.Anandacha Shidha 2024 Update

याबद्दल अधिकच्या माहितीसाठीइथे क्लिक करा
दुध अनुदान योजना अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा