दूध ५ रु.अनुदान पाहिजे तर हे करणे आवश्यक तरच मिळणार अनुदान | Dudh Anudan Maharashtra 2024

Dudh Anudan Maharashtra 2024 राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो मागील काही महिन्यांपासून दूध दरांमध्ये झालेल्या घसरणीनंतर राज्य सरकारने सर्व खाजगी व सहकारी दूध संघांना शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

सदर अनुदानाबद्दल अधिसूचना देखील सरकारच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर दुधाप्रमाणे पाच रुपये अनुदान जमा करण्यात येणार आहे परंतु या अनुदानासाठी गाईला एअर टॅग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नसल्यास सर्व दूध उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शेतकरी मित्रांनो गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य सरकारच्या आदेशानंतर देखील अनेक खाजगी दूध संघाने मनमानी पद्धतीने कारभार करत शेतकऱ्यांच्या दुधाचा दर सपाट्याने कमी केला. ४० रुपयापर्यंत गेलेला हा दुधाचा दर सध्या 25 रुपयांवर आहे आणि यामुळे दूध उत्पादक शेतकरी हा कोलमडून गेला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सर्व सहकारी व खाजगी दूध उत्पादक संघांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

यासाठी शासनाने प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ घेण्यासाठी दूध उत्पादक सभासद ज्या संस्थेत दूध पुरवठा करत असतील या संस्थेकडे कागदपत्रांची पूर्तता करायची आहे.

आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नाव, आधार कार्ड, ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे अशा बँकेचे नाव, खाते क्रमांक, आय एफ एस सी कोड, बँक पासबुक झेरॉक्स किंवा चेक झेरॉक्स यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पशुधनाची संख्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या पशुधन संख्या पैकी एअर टॅग केलेल्या पशुंची संख्या व एअर टॅग क्रमांक

Dudh Anudan List 2024 Maharashtra

शेतकरी मित्रांनो एअर टॅग म्हणजे गाईंच्या कानाला लावण्यात येणारा पिवळा टॅग तुम्ही अनेक ठिकाणी गाईंना हा पिवळा टॅग लावलेला पाहिला असेल हा पिवळा टॅग म्हणजेच गाईंचा आधार क्रमांक होय. आणि याची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची आहे. या एअरटेल क्रमांक मध्ये गाईंची जात, त्याग नोंद करताना चे वय गाईच्या मालकाचे नाव व मोबाईल नंबर अशी सर्व माहिती दिलेली असते.

शेतकरी मित्रांनो एअरटॅगमुळे गाईची ओळख पटवणे सोपे असते तसेच सरकारकडे देखील गाव, तालुका, जिल्हा किंवा राज्यस्तरावर पशुपालकाकडे असणाऱ्या गाईंची संख्या किती आहे याची नोंद घेणे देखील सोपे होते.

गाईंचा एअर टॅग नंबर काढण्यासाठी तुम्ही तुमच्या गावाजवळील सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क करू शकता आणि त्यानंतर उपलब्ध टॅगनुसार तुमच्या गाईंना देण्यात येईल आणि यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Dudh Anudan Maharashtra 2024

Dudh Anudan List pdf 2024

राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दूध संकलन केंद्र चालकास जमा करायचे आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय अनुदान शेतकऱ्यांना मिळणार नाही यामध्ये देण्यात येणारा लाभ हा डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घेणे आवश्यक असणार आहे.

बँक पासबुकची झेरॉक्स ज्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे त्याच द्यायची आहे आणि लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे.Dudh Anudan Maharashtra 2024

दुध अनुदान GR पाहण्यासाठीइथे क्लिक करा
पीएम केसीसी कर्ज योजना अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

Leave a Comment