राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 03 लाख रु.पर्यंत कर्ज पीएम केसीसी योजना सुरु | PM KCC Yojana

PM KCC Yojana राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शेतीच्या जोडीला पूरक असे व्यवसाय करण्यासाठी अत्यंत कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी राज्य सरकारकडून पीएम केसीसी कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी पात्र असणार आहेत.

PM KCC Loan Yojana Maharashtra

या योजनेचा लाभ आणि प्रक्रिया देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोप्पी करण्यात आली आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला आहे आणि अजूनही अनेक शेतकरी घेत आहेत अत्यंत कमी कागदपत्रे आणि त्वरित मंजुरी मिळत असल्यामुळे राज्यातील शेतकरी या योजनेला प्राधान्य देत आहेत.शेतीपूरक व्यवसाय जसे की पशुपालन,शेळीपालन,कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचे काम सरकार करत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत नाबार्ड आणि आरबीआय यांच्या मार्फत शेतकऱ्यांना त्यांचा जमिनीचा दाखला किंवा सात बारा उतारा गहान ठेऊन शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.नाबार्ड आणि आरबीआय यांनी किसान क्रेडीट कार्ड भारत सरकार हि योजना १९९८ मध्ये स्थापन केली.दरवर्षी या योजनेच्या अंतर्गत लाखो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा केला जातो.

PM KCC Loan Apply Online

KCC किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत ज्या काही सहकारी संस्था सोसायट्या असतील त्यांना तर ३ लाख रु.पर्यंत दिले जाणारे कर्ज हे बिनव्याजी असते.किसान क्रेडीट कार्ड या योजनेद्वारे दिले जाणारे कर्ज हे फक्त शेतकऱ्यांसाठीच असते इतर कोणालाही हे कार्ड देखील मिळत नाही आणि या कार्डद्वारे मिळणाऱ्या कोणत्याही योजनांचा लाभ देखील मिळत नाही.

बँकेतून किसान क्रेडीट कार्ड काढून जर पिक कर्ज काढले तर त्याला ४% व्याजदर असतो आणि याची मर्यादा हि ३ लाख रु.असतेयात शेतकऱ्यांना वार्षिक नवे जुने करण्यासाठी लाभ घेतलेल्या रक्कमेच्या ७% व्याजदराने पैसे भरावे लागतात परंतु त्यातील ३% रक्कम हि शेतकऱ्यांच्या खात्यावर पुन्हा सोडली जाते.

KCC Karj Yojana Maharashtra

पीएम केसीसी योजना फायदे –

१.किसान क्रेडीट कार्ड या योजनेद्वारे शेतकऱ्यांना अत्यंत कमी कागदपत्रे घेऊन अत्यंत कमी ४% व्याजदरात ३ लाख रु.पर्यंतचे कर्ज त्वरित दिले जाते.

२.किसान क्रेडीट कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही अवघड प्रक्रियेला तोंड द्यावे लागत नाही.कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा बँकेत जाऊन अगदी सहज शेतकरी किसान क्रेडीट कार्ड काढू शकतो.

३.शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्ज रक्कमेचा ५ वर्षात जर वेळेवर परतफेड केली तर शेतकऱ्याला व्याजदरात २% सुट दिली जाते.

४.शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डद्वारे मिळणारे कर्ज हे त्वरित मिळत असल्याने त्यासाठी शेतकऱ्यांना जास्त कागदपत्रे देखील लागत नाहीत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PM KCC Yojana

५.शेतीखर्चासाठी,मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर घरखर्च भागविण्यासाठी शेतकरी अनेकदा आर्थिक अडचणीत असल्याचा आपण पाहत असतो यातूनच शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी हि योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच स्थापन केली आहे.

६.अनेक ठिकाणी खाजगी बँका किंवा सावकार यांच्याकडून कर्ज घेऊन त्यावर अनेक मोठ मोठे व्याज देऊन शेतकरी संकटात जातो आणि परिणामी अनेक शेतकरी आत्महत्या करतात हेदेखील आपण पाहिले आहे परंतु या योजनेतून कर्ज घेतल्यास व्याजदर अत्यंत कमी असल्याने शेतकरी हा कधीही कर्जबाजारी होत नाही.

७.किसान क्रेडीट कार्ड योजनेद्वारे शेतकरी हा शेती सोबत पशुपालन,कुक्कुटपालन,शेळीपालन,मत्स्यपालन यांसारखे देखील अनेक व्यवसाय करू शकणार आहे आणि आपले आर्थिक उत्पन्न वाढवू शकणार आहे.PM KCC Yojana

८.शेतकऱ्यांनी जर किसान क्रेडीट कार्ड काढले तर या कार्डसोबत शेतकऱ्यांना १ लाख रु.पर्यंतचा आरोग्य विमा देखील दिला जातो.

शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

Leave a Comment