राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक पेंशन योजना लाभार्थी यादी प्रसिद्ध | Namo Shetkari Yojana List pdf

Namo Shetkari Yojana List Pdf शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी व आर्थिक मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पेंशन म्हणून अनुदान जमा केले जाते.यामध्ये केंद्र व राज्य सरकार दोन्हीकडून शेतकऱ्यांना हि पेंशन दिली जाते.

परंतु या योजनेचे पैसे हे कुटुंबातील किती व्यक्तींना मिळणार तसेच योजनेसाठी अर्ज कसा करता येणार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे तसेच या पेन्शनसाठी पात्रता काय आहेत याचीदेखील माहिती देण्यात आली आहे.केंद्राची योजना आणि त्याच योजनेला राज्याने देखील निधी वाढवून दिला आहे आणि या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे निधी जमा केला जातो.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Shetkari Pension Yojana 2024

मित्रांनो सध्या आपण संपूर्ण देशातच पाहत आहोत कि वातावरण बदल,अवकाळी पाऊस,दुष्काळ अशा अनेक समस्येंना शेतकरी तोंड देत आहे यातच नुकसान भरपाई,पीकविमा अशा अनेक योजना असून शेतकऱ्यांना त्याचा पुरेसा लाभ मिळत नाही.म्हणून आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात मदत देण्याचा निर्णय घेतला आहे याचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत जे वंचित आहेत त्यांनी देखील लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मित्रांनो केंद्र सरकारने 2019 साली देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी वार्षिक 6000 रुपये देणार असल्याची घोषणा केली. आणि त्यानुसार सर्व शेतकऱ्यांकडून ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले. वर्षातून दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹2000 प्रमाणे वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतात.

दर चार महिन्याला खात्यावर येणाऱ्या या ₹2000 मुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी किंवा इतर खर्चासाठी आर्थिक मदत होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दल समाधान आहे. यातच आता या योजनेत भर टाकून शेतकऱ्यांना वार्षिक 8000 रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून याबाबत आता लवकरच घोषणा होणार आहे.

Shetkari Pension Yojana Maharashtra Registration

पी एम किसान सन्मान योजनेचे आजपर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. म्हणजेच प्रत्येकी ३०००० रुपये शेतकऱ्यांना पी एम किसान योजने अंतर्गत मिळाले आहेत.महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील पीएम किसान या योजनेशीच संलग्न आहे.त्यामुळे त्या योजनेचे देखील वार्षिक ६००० रु.राज्यातील शेतकऱ्यांना मिळतात.

मित्रांनो तुमचे कुटुंबाचे रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका एक असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो जर तुमच्या नावावर स्वतंत्र सात बारा असेल तर कारण या योजनेच्या पात्रते मध्ये पती-पत्नी पैकी एका व्यक्तीला हि पेंशन मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.म्हणजेच मुलाला किंवा मुलीला आणि त्यांच्या वडिलांना हि पेंशन मिळण्यास काहीच अडचण नाही.

त्यामुळे तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर पीएम किसान व नमो शेतकरी पेंशन मिळत असेल आणि तुम्हाला देखील हवी असेल तर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पाध्तीने अर्ज करायचे आहेत आणि अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Farmer Pension Scheme 2024 Maharashtra

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – इथे क्लिक करा

शेतकरी अनुदान योजना अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

१.वरील लिंक क्लिक करून वेबसाईट वर जा.

२.वेबसाईट वर गेल्यानंतर “Rural Farmer Registration” हा पर्याय निवडा.

३.नंतर वेबसाईट वर आपला आधार नंबर टाकायचा आहे.तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

४.यानंतर तुमचे राज्य निवडून तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून तुम्हाला पुढे जायचे आहे.

५.पुढे तुम्हाला आता फॉर्म ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला जिल्हा,तालुका,गाव निवडायचे आहे.

६.यानंतर तुम्हाला “Land Registration ID” टाकायचा आहे.

७.रेशन कार्डचा नंबर देखील या फॉर्म मध्ये तुम्हाला भरायचा आहे.

८.यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती – खाते नंबर,गट नंबर,क्षेत्र सर्व माहिती सविस्तर भरायची आहे.

९.हे झाल्यानंतर आधार कार्ड,७/१२ अपलोड करायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे.Namo Shetkari Yojana List pdf

Leave a Comment