शेतकऱ्यांना २०२४ मध्ये महा डीबीटी योजनेसाठी मिळणार ८०% अनुदान अर्ज सुरु | MahaDBT Yojana 2024

MahaDBT Yojana 2024 MahaDBT Anudan Yojana 2023 राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार कडून अजून एक गिफ्ट देण्यात आले आहे आता शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणाऱ्या अवजार व ट्रॅक्टर तसेच कुट्टीमशीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना रक्कमेच्या तब्बल ८०% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना अर्ज करणे आवश्यक असणार आहे आणि यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून आपले सरकार सेवा केंद्र च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकणार आहेत यासाठी संपूर्ण प्रक्रिया अतिशय गतिमान करण्यात आली आहे.सविस्तर जाहिरात व अर्ज करण्यासाठी लिंक याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कडबा कुट्टी, पॉवर ट्रेलर यांच्यासह अनेक कृषी यंत्र आणि शेतीशी निगडित अवजार खरेदीसाठी अनुदान दिले जाते. या अनुदानाचा आजवर अनेक शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे.कृषी यांत्रिकीकरण अभियान योजनेअंतर्गत शेती व शेतकरी यांच्याशी संबंधित क्षेत्रांना अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी नवनवीन टेक्नॉलॉजी चा वापर करून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाडीबीटी कृषी उपकरणांना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामार्फत अनुदान दिले जाते. केंद्र व राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी ची ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.

Shetkari Yojana MahaDBT Apply Online :

कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रे व त्यासोबत उपकरणांच्या खरेदीवर तब्बल 50 ते 80 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान दिले जायचे. या योजनेचा आजवर अनेक शेतकऱ्यांनी लाभ देखील घेतला आहे. आता मात्र या योजनेत सरकारकडून मोठा बदल करण्यात आला आहे आणि हे शेतकऱ्यांना एक मोठे गिफ्ट असणार आहे. कारण काही यंत्रांच्या खरेदीत अनुदानामध्ये सरकारकडून तब्बल तिप्पट वाढ करण्यात आली आहे. यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कम्बाईन हार्वेस्टर यांचा समावेश करण्यात आला आहे.

महाडीबीटी द्वारे मिळणाऱ्या या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. या योजनेअंतर्गत पॉवर ट्रेलर खरेदीसाठी 01 लाख 20,000 अनुदान दिले जाणार आहे. तर हार्वेस्टर साठी 8 लाख अनुदान जाहीर करण्यात आले आहे, व ट्रॅक्टर साठी 5 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. जर मोबाईल वरून शक्य नसेल तर सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जायचे आहे.

Shetkari Tractor Yojana 2024 Registration

अनुदाना बद्दल बोलायचे झाल्यास ट्रॅक्टर, हार्वेस्टर,नांगर पेरणी यंत्र, मल्चिंग यंत्र, मळणी यंत्र, पॉवर ट्रेलर, रोटावेटर, कुट्टी मशीन यांसारख्या कृषी यंत्रावर शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. यासाठी सर्वसामान्य श्रेणीत जे शेतकरी आहेत त्यांना उपकरणाच्या रकमेच्या 40% पर्यंत अनुदान हे दिले जाते. तर जे शेतकरी मागासवर्गीय प्रवर्गात आहेत किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा शेतकऱ्यांना उपकरणाच्या रकमेच्या 50% पर्यंत अनुदान हे दिले जाते.

या योजनेचे मूळ उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रांचा व उपकरणांचा वापर करून शेतीतील उत्पन्न वाढवावे तसेच शेतकऱ्यांना या यंत्राच्या सहाय्याने काम करण्यास मदत होणे हाच आहे. मित्रांनो सध्या राज्यातील शेतकरी हा दुष्काळ, तसेच अवकाळी पाऊस या अनेक संकटांना तोंड देत आहे. यामुळेच शेतकऱ्यांना सध्या आर्थिक आधाराची गरज भासते यासाठीच राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये पीएम किसान सम्मान योजना, नमो शेतकरी योजना, पिक विमा योजना, यासोबतच अवजारे अनुदान योजना या योजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

नोंदणी करताना होम पेजवर गेल्यानंतर शेतकऱ्यांना नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करायचे आहे.

  • यानंतर अर्ज करा बटनावर क्लिक करायचे आहे.
    पुढे गेल्यानंतर नवीन टॅबमध्ये तुमच्यासमोर सात पर्याय दिसतील यामध्ये कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
    यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे जसे की नाव, गाव, तालुका, मुख्य घटकांमध्ये ज्या यंत्राची तुम्ही खरेदी करणार आहात त्याची माहिती भरायची आहे.
    पुढे गेल्यानंतर तुम्हाला जर ट्रॅक्टर खरेदी करायचे असेल तर ट्रॅक्टर पर्याय निवडून त्यामध्ये किती एचपी चा व कोणत्या ड्राईव्हचा ट्रॅक्टर तुम्हाला खरेदी करायचा आहे हे सर्व पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत आणि जतन करावर क्लिक करायचे आहे.
    ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला अर्ज केल्याची प्रिंट मिळणार आहे.
    अर्ज व्यवस्थित सबमिट करायचा आहे तसेच अर्ज करताना सर्व शेतकऱ्यांनी चालू मोबाईल नंबर व इमेल आयडी देयचा आहे जेणेकरून या योजनेंतर्गत तुमचे नाव आल्यास तुम्हाला कळविण्यात येते आणि त्यानुसार पुढील कागदपत्रे पडताळणी व सर्व प्रक्रिया शेतकऱ्यांकडून करून घेतली जाते.

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment