10वी पास साठी राज्य मुद्रणालय विभागात सरकारी नोकरीच्या संधी पगार 65 हजार | DGPS Bharti 2024

DGPS Bharti 2024 मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन मुद्रण, लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई येथे नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. सदरील भरतीमध्ये विविध विभागातील पदांसाठीच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.आणि सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी दहावी पास, बारावी पास ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

DGPS,मुंबई अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

DGPS Recruitement 2024

शासन मुद्रण, लेखनसामग्री आणि प्रकाशन संचालनालय मध्ये होणाऱ्या सदरच्या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. गेली महिन्याभरापासून संपूर्ण राज्यातील उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करत आहेत.

सदरील भरतीमध्ये सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी), वरिष्ठ मुद्रितशोधक, मुद्रितशोधक, मूळप्रतवाचक, दूरध्वनी चालक, बांधणी सहाय्यकारी या पदांसाठीच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यामध्ये विविध पदांसाठी उमेदवार त्यांच्या इच्छेनुसार अर्ज करू शकणार आहेत उद्यासाठी दहावी पास एवढीच शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असून उमेदवार 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपले अर्ज सबमिट करू शकणार आहेत. 29 फेब्रुवारी 2024 नंतर या भरतीचा अर्ज करण्यासाठी ची लिंक बंद केली जाणार आहे आणि त्यानंतर उमेदवार सदरील भरतीचा अर्ज करू शकणार नाही आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची मुदत वाढ दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

DGPS Job Vacancy 2024

भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य शासन मुद्रण, लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई भरती २०२४

विभाग – सरकारी नोकरी

पदाचे नाव – असिस्टंट सुपरवायझर, सीनियर रीडर, रीडर, कॉपी होल्डर, टेलिफोन ऑपरेटर, बाईंडिंग ऑक्सिलरी

पदसंख्या – 54

शैक्षणिक पात्रता –

  • असिस्टंट सुपरवायझर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावीची परीक्षा पास असल्याचे प्रमाणपत्र असावे.
  • सीनियर रीडर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्ड किंवा मंडळातून दहावी पास प्रमाणपत्र असावे व त्यासोबत मराठी हिंदी व इंग्रजी या भाषेमध्ये चांगले संभाषण करण्याचे कौशल्य असावे.
  • रीडर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्ड किंवा मंडळातून दहावी पास प्रमाणपत्र असावे व त्यासोबत मराठी हिंदी व इंग्रजी या भाषेमध्ये चांगले संभाषण करण्याचे कौशल्य असावे.
  • कॉपी होल्डर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्ड किंवा मंडळातून दहावी पास प्रमाणपत्र असावे.
  • टेलिफोन ऑपरेटर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्ड किंवा मंडळातून दहावी पास प्रमाणपत्र असावे.
  • बाईंडिंग ऑक्सिलरी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्ड किंवा मंडळातून नववी पास प्रमाणपत्र असावे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 29 फेब्रुवारी 2024

वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 वर्षे ते 38 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
  • एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 900 शुल्क असणार आहे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र

वेतनश्रेणी – 18000-92300/- रुपये महिना

DGPS Bharti 2024 Apply Online

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • 10 वी पास निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी 29 फेब्रुवारी 2024 ही अंतिम मुदत असणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केले गेलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही.

आवश्यक कागदपत्र व्यवस्थितरित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.

उमेदवाराने रिसेंटमधीलच फोटो अपलोड करायचा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DGPS Bharti 2024

फोटोचे बॅकग्राऊंड शक्यतो पांढरे असावे.

एकदा सबमिट झालेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही.

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीइथे क्लिक करा
IDBI बँक भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा