दुध उत्पादकांना पुन्हा फटका ? दुध दर घसरले पहा GR | Dudh Dar News

Dudh Dar News राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 15 मार्च 2024 च्या अधिकृत शासन निर्णयानुसार दूध दर आता 02 रुपयांनी स्वस्त झाला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना हा उन्हाळ्याच्या तोंडावर मोठा फटका असणार आहे. या शासन निर्णयामध्ये सर्व माहिती देण्यात आली आहे. तसेच अनुदानाचे काय होणार याबद्दल देखील काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन शासन निर्णयामध्ये माहिती नमूद करण्यात आली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आणि GR म्हणजेच शासन निर्णय खाली देण्यात आला आहे.

Dudh Anudan Maharashtra 2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभाग यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रतिलिटर 05 रुपये अनुदान देण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

अनेक सहकारी व खाजगी दूध संघांना सदरील अनुदान जमा करण्यात आले असून उर्वरित दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर हे अनुदान जमा करण्यात येणार आहे. सदरील दूध अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेण्यासाठी राज्य सरकार द्वारे प्रयत्न करणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. परंतु या जीआर मध्ये अजून एक महत्त्वाची माहिती नमूद करण्यात आली आहे.

Dudh Dar Maharashtra 2024

15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या शासन निर्णयामध्ये मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकारी दूध संघ व खाजगी दूध संघ प्रकल्पात मार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ या गुणप्रतिकरीता किमान रुपये 27/- प्रति लिटर ऐवजी किमान रुपये 25/- प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

म्हणजेच या शासन निर्णयानुसार आता दूध उत्पादकांना प्रतिलिटर 02 रुपये कमी भाव मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि यामुळेच आणि दुष्काळात आणि उन्हाळ्याच्या तोंडावरच शेतकऱ्यांना हा मोठा फटका असणार आहे. कारण आजवर मागील काही महिन्यांपासून सतत दुधाच्या दरात होत असलेली घसरण परंतु त्या तुलनेत चाऱ्याचे भाव मात्र अद्यापही कमी न झाल्याने शेतकरी आधीच चिंतेत आहे.

राज्यातील अजूनही अनेक शेतकरी हे 05 रुपये दूध अनुदानाच्या प्रतीक्षेत असतानाच शेतकऱ्यांच्या दुधासाठी 02 रुपये प्रतिलिटर कमी झाल्याने हा शेतकऱ्यांवर मोठा फटका बसणार आहे. दूध अनुदान मिळण्यासाठी एअर टॅग, आधार कार्ड ला बँक खाते लिंक, मोबाईल नंबर लिंक, माहिती अपलोड यामध्ये शेतकरी गेली अनेक दिवसांपासून अडकून पडलेला असताना आता हा प्रसिद्ध करण्यात आलेला शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी धक्कादायक आहे.

Dudh Dar News

Dudh Dar Maharashtra GR

सदरील शासन निर्णयाचे अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असून याबाबत आता सर्व दूध संघांना देखील पत्रक पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दलचा GR तुम्ही खाली पाहू शकणार आहात.Dudh Dar News

दुध दराचा अधिकृत GR पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा