राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मंजूर या 40 तालुक्यांतील शेतकऱ्यांचा समावेश पहा यादी | Dushkal Anudan List 2024

Dushkal Anudan List 2024 राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आता राज्य सरकारकडून निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आणि त्यामुळेच राज्यातील 40 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना आता या रकमेचा लाभ देण्यात येणार आहे.

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांचे द्वारे सदरचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये शेतकऱ्यांसाठी 2443 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सदरचा निधी जमा होणार आहे.

Dushkal Yadi 2023 Maharashtra

या शासन निर्णयानुसार अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्यास राज्याच्या आपत्ती प्रतिसाद निधीमधून शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. सदरील मदत ही निविष्ठा अनुदान स्वरूपात डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. यानुसारच जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 3 हेक्टर पर्यंत मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून आणि राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 244322.71 लक्ष निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यास राज्य सरकारच्या झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

शेतकरी मित्रांनो सदरील निधीसाठी दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन निर्णय बरोबर जोडलेल्या पत्रात आणि अटी देखील देण्यात आले आहेत यानुसार एका हंगामात एक वेळ याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करण्यास सांगण्यात आल्या आहेत.

Dushkal List in Maharashtra

2023 च्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी व पुरु यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानेकरिताच्या शेतकऱ्यांनी मदत घेतली आहे अशा शेतकऱ्यांना पुन्हा दुष्काळासाठी नुकसान भरपाई देण्यात येणार नाही. तसेच जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार पावसाळी हंगाम 2023 मध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त तीन हेक्टर च्या मर्यादित असल्याची खातरजमा करण्यात यावी.

ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे आणि शेतकऱ्यांच्या नुकसानाचा पंचनामा करण्यात आला आहे अशा शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. यामध्ये तालुक्यांची यादी व लाभार्थी यादी देखील खाली देण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येत्या काही दिवसात सदरील दुष्काळ निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सदरील दुष्काळ नुकसान भरपाई निधी जमा होण्यासाठी आदेश दिले आहेत. तसेच पिक विमा कंपन्यांना देखील त्वरित जे शेतकरी पात्र असतील अशा शेतकऱ्यांना सरसकट रक्कम देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक संकट दूर होण्यास मदत होणार आहे.

Dushkal Anudan 2023

दुष्काळ नुकसान भरपाई अनुदानासाठी पात्र असलेले तालुके –

 • मालेगाव
 • सिन्नर
 • येवला
 • सिंदखेडा
 • नंदुरबार
 • चाळीसगाव
 • लोणार
 • बुलढाणा
 • छत्रपती संभाजी नगर
 • सोयगाव
 • भोकरदन
 • बदनापूर
 • जालना
 • अंबड
 • मंठा
 • वडवणी
 • धारूर
 • अंबाजोगाई
 • वाशी
 • धाराशिव
 • लोहारा
 • सासवड/ पुरंदर
 • बारामती
 • दौंड
 • शिरूर घोडनदी
 • इंदापूर
 • वाई
 • खंडाळा
 • हातकणंगले
 • गडहिंग्लज
 • बार्शी
 • माळशिरस
 • सांगोला
 • करमाळा
 • माढा
 • शिराळा
 • कडेगाव
 • खानापूर विटा
 • मिरज

या 39 तालुक्यांमध्ये तब्बल 22 लाख 34 हजार 934 शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई निधी देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करने देखील अनिवार्य असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायची आहे आणि लाभार्थी यादी पाहण्यासाठी आपल्या तालुकास्तरीय पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये जाऊन तुम्हाला सदरची लाभार्थी यादी पाहता येणार आहे.

Dushkal Anudan List 2024
दुष्काळ नुकसान भरपाई GR पाहण्यासाठीइथे क्लिक करा
दुध अनुदान लाभार्थी यादी पाहण्यासाठीइथे क्लिक करा
शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा