Maharashtra HSC Result 2025 मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारे बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला असून यामध्ये आज सकाळी 11 वाजताच बोर्डाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि या पत्रकार परिषदेत द्वारे यावर्षीचा बारावीचा निकाल विभागनिहाय आकडेवारी असेल अथवा जिल्ह्याचा निकाल देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील निकालामध्ये मुलींची बाजी पाहायला मिळाली आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये यावर्षी देखील निकाल लागलेला आहे. यामध्ये परीक्षार्थी दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहू शकणार आहेत यासाठी वेबसाईट ची यादी देखील खाली देण्यात आलेली आहे त्यासोबतच विभागनिहाय निकाल कसा लागलेला आहे याबद्दल देखील खाली माहिती दिली आहे.HSC Result Check Online
बारावी निकाल विभागनिहाय आकडेवारी :
कोकण : 97.51%
पुणे : 94.44%
नाशिक : 94.71%
कोल्हापूर : 94.24%
छत्रपती संभाजीनगर : 94.04%
अमरावती : 93%
नागपूर : 93.12%
लातूर : 92.36%
मुंबई : 91.95%
बारावी निकाल पाहण्यासाठी वेबसाईट :
https://results.digilocker.gov.in
