Namo Shetkari Beneficiary List मित्रांनो राज्यभरातील सुमारे 95 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी 6000 रुपये जमा होणार आहेत. यासाठी आता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या दुपारीपासून 2000 रुपयाप्रमाणे सलग 3 हप्ते जमा होणार आहेत.
परंतु राज्यातील शेतकऱ्यांना जमा होणारा हा निधी केवळ याच बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आहे. याबाबत शासन निर्णयानुसार दिले गेलेली सविस्तर माहिती खाली सांगण्यात आली आहे. तुमचे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार याबद्दल देखील तुम्हाला माहिती घेता येणार आहे.
Namo Shetkari Yojana Beneficiary Status
शेतकरी मित्रांनो दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार असल्याची माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. आणि त्यानुसार देशातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2000 रुपये जमा होणार आहे.
पी एम किसान या केंद्र सरकारच्या योजनेला संलग्न अशी राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा 2023 मध्ये केली आणि त्यानुसार राज्यभरातून सुमारे 87 लाख शेतकऱ्यांना 28 ऑक्टोबर 2023 रोजी दोन हजार रुपयाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला. सदरील योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार याची वाट सर्व शेतकरी पाहत होते.
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची दुसरा व तिसरा हप्ता सोबत देण्याबाबतचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्यानुसार या योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे तर तिसऱ्या हप्त्यासाठी 2000 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. आणि असे महाराष्ट्र राज्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना उद्या 6000 रुपये मिळणार आहेत.
Namo Shetkari Beneficiary Status
शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी कोणतीही रजिस्ट्रेशनची पद्धत ठेवण्यात आली नाही म्हणजेच पीएम किसान चा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ थेट देण्याचा निर्णय राज्य सरकार द्वारे घेण्यात आला होता. पीएम किसान या योजनेसाठी 2023 मध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांना ईकेवायसी करण्यात सांगण्यात आली होती.
सदरील हफ्ते फक्त याच बँक खात्यात जमा होणार –
या ईकेवायसी नंतर अनेक शेतकऱ्यांचे लाभार्थी बँक खाते बदलले गेले आणि ज्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. आता जमा होणारा हप्ता कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार याबाबत शेतकरी चौकशी करत असताना पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो तुमच्या आधार कार्ड ला जे बँक खाते लिंक आहे केवळ त्याच बँक खात्यात सदरचे रक्कम जमा होणार आहे.
तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसल्यास तुम्हाला या योजनेचे लाभ दिले जाणार नाहीत. यासाठी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचे बँक खाते आधार NPCI ला लिंक करायला सांगायचे आहे, अथवा तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्टमध्ये जावो तुमचे खाते उघडायचे आहे. पोस्टमध्ये जे खाते ओपन होईल ते थेट तुमच्या आधार कार्ड ला लिंक झालेले असते.
Namo Shetkari Yojana Registration
सदरील योजनेसाठी नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू असून नव्याने केलेले अर्ज हे त्वरित स्वीकारले जात आहेत यासाठी काही अटी शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत त्या खालील प्रमाणे –
- लाभ घेणारा शेतकरी अल्पभूधारक असावा.
- शेतकरी पती-पत्नी पैकी एकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- शेतकरी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य नसावा.
- लाभ घेण्यासाठी शेतकरी सरकारी नोकरदार नसावा.
- शेतकरी इन्कम टॅक्स रिटर्न भरणारा नसावा.
- शेतकऱ्याच्या नावावर स्वतंत्र सातबारा असावा.
आधार-बँक खाते लिंक माहिती पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
नमो शेतकरी लाभार्थी यादी पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
नमो शेतकरी नवीन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |