PM Kisan 16 Installment सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील अजूनही खाली दिलेली चार कामे केली नसतील तर तुम्हाला मोठ्या नुकसानास सामोरे जावे लागणार आहे. कारण 15 जानेवारी 2024 नंतर तुम्ही सर्व कामे करू शकणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला मिळणारा सर्व लाभ हा बंद होईल.
शेतकरी मित्रांनो देशातील बारा कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये पीएम किसान सन्मान योजनेच्या मार्फत दिले जातात. या योजनेसाठी आता 15 जानेवारी 2024 पर्यंत सर्व अपडेट करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे यानंतर जे शेतकरी या सर्व अपडेट करणार नाही त्यांना पुढील सर्व हप्ते मिळणार नाहीत.
PM Kisan Next Installment Date
शेतकरी मित्रांनो देशातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 2019 पासून पीएम किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पेन्शन स्वरूपात वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा झाली. आणि त्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बँक खात्यावर दोन हजार रुपयांप्रमाणे वार्षिक तीन हप्ते देण्यास सुरुवात झाली.
पीएम किसान सन्मान योजनेचे आजवर देशातील बारा कोटी शेतकऱ्यांना तसेच महाराष्ट्र राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये प्रमाणे एकूण 15 हप्ते जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच प्रत्येकी शेतकऱ्याला तीस हजार रुपये या योजनेअंतर्गत देण्यात आले आहेत आता 15 जानेवारी पर्यंत सर्व लाभार्थ्यांना खालील कामे करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शेतकरी मित्रांनो 2023 मध्ये पी एम किसान योजनेमध्ये नवीन अपडेट करण्यात आले आहेत आणि त्यानुसार सुरुवातीला अल्पभूधारक शेतकरी ही असलेली अट आता पीएम किसान योजनेअंतर्गत असणार नाही याचाच अर्थ पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र नावावर असलेली शेतकरी देखील आता पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
PM Kisan 16 Installment List
पी एम किसान चा लाभ घ्यायचा असेल तर खालील कामे 15 जानेवारी 2024 च्या आधी करावी लागणार –
New Registration Update : शेतकऱ्यांनो तुम्ही जर पीएम किसान योजनेसाठी अद्यापही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे 15 जानेवारी 2024 च्या आधी पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मोबाईल वरून मोफत अर्ज करू शकणार आहात. यामध्ये अर्ज करताना अडचण येत असल्यास तुम्ही तलाठ्याकडे जाऊ अथवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन या योजनेसाठी नवीन अर्ज करू शकणार आहात.
Pm Kisan Land Seeding Update : पी एम किसान चा लाभ घेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2023 मध्ये अनेक अडचणी आल्याचे आपण पाहिले. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अद्यापही लँड सीडींग बद्दल अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर स्वतंत्र सातबारा असताना देखील पीएम किसान च्या बेनिफिशरी स्टेटस मध्ये लँड सीडींग नो हा एरर दाखवत आहे. लँड सीडींग दुरुस्तीसाठी तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती अद्यावत करावी लागणार आहे यासाठी तुम्हाला तुमचा सातबारा आठ उतारा घेऊन तलाठी कार्यालयात जायचे आहे आणि तिथून तुमच्या जमिनीची माहिती अद्यावत करून घ्यायची आहे.
तलाठी कार्यालयात लँड सीडींग अपडेट करत नसतील तर तुम्हाला तुमची कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात जायचे आहे त्या ठिकाणी संबंधित पीएम किसान अधिकाऱ्यांची भेट घेऊन तुम्हाला तुमची लँड सीडींग अपडेट करून घेणे आवश्यक आहे 15 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही हे काम करणे अनिवार्य आहे.
Pm Kisan Next Installment List Pdf
Pm Kisan ekyc : पी एम किसान योजनेचा लाभ देत असताना अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने आणि अपात्र शेतकऱ्यांकडून या योजनेचा लाभ घेत असल्याचे लक्षात आले आणि त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना इ केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. यामध्ये अजूनही अनेक शेतकरी प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे आता मात्र 15 जानेवारी 2024 नंतर जे शेतकरी केवायसी करणार नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेपासून कायमचे बाद करण्यात येईल.
इ केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान च्या वेबसाईटवर जाऊन आपला आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर टाकून अगदी काही मिनिटात ही केवायसी करता येणार आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क ठेवण्यात आले नाही त्यामुळे तुम्ही जर पी एम किसान लाभार्थी असाल तर लगेच केवायसी करून घ्या.
पीएम किसान नवीन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
नमो शेतकरी योजना अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
Aadhar Bank Seeding : पीएम किसान चा लाभ 2023 पासून डीबीटी द्वारेच शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसल्यास असे देखील शेतकरी या योजनेपासून आता वंचित राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील आजच आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घ्यायची आहे. अथवा पोस्टात जाऊन तुम्हाला खाते उघडावे लागणार आहे म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये अकाउंट ओपन करावे लागणार आहे.
वरील सर्व कामे 15 जानेवारी 2024 च्या आधी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना करायची आहेत आणि तुम्ही जर अजूनही पी एम किसान योजनेचा लाभ घेत नसाल तर या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आजच तुम्ही तुमचा अर्ज भरायचा आहे.
Pm Kisan 16 Installment Date
पी एम किसान योजनेच्या नवीन रजिस्ट्रेशन साठी खाली दिलेली प्रक्रिया करायची आहे –
- यासाठी वर दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला जायचे आहे.
- रुरल फार्मर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून शेतकऱ्याची माहिती भरून घ्यायची आहे. यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे कारण मोबाईल नंबर वर आलेल्या ओटीपीवरूनच पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे.
- माहिती मध्ये गावाचे नाव, एकूण क्षेत्र, गट नंबर यांसारखी माहिती शेतकऱ्यांनी भरायची आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी रेशन कार्ड नंबर आणि लँड रजिस्ट्रेशन आयडी देखील टाकायचा आहे.
- लँड रजिस्ट्रेशन आयडी मध्ये फेरफार नंबर म्हणजेच लँड रजिस्ट्रेशन आयडी म्हणून वापरायचा आहे आणि सातबारा व बँक पासबुक व्यवस्थित स्कॅन करून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.
वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यास तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे.PM Kisan 16 Installment