अखेर तारीख ठरली..यादिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा १७वा हफ्ता | Pm Kisan 17th Installment Date

Pm Kisan 17th Installment Date देशातील सर्व शेतकरी ज्या दिवसाची वाट पाहत होते त्याची तारीख अखेर फिक्स करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे कारण पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणारा आहे याबाबत अधिकृत तारखेची देखील आता घोषणा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सतरावा हप्ता कोणाकोणाला मिळणार याबाबत देखील सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता होतीच आणि त्यामुळेच लाभार्थी यादी देखील आता प्रसिद्ध करण्यात आले असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. तुमचे देखील यादीत नाव आहे का हे तुम्ही आता पाहू शकणार आहात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Pm Kisan 17 Installment Date

पीएम किसान योजनेच्या वतीने एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून या परिपत्रकामध्ये सांगितल्याप्रमाणे देशभरातील सुमारे 09 कोटी शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्र राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता दिला जाणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिलीच स्वाक्षरी पीएम किसान योजनेच्या हप्ता वितरित करण्यावर केली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
योजनेचे नावपीएम किसान सन्मान योजना
विभागकेंद्रीय कृषी व महसूल विभाग
लाभार्थी संख्या०९ कोटी शेतकरी
एकूण जमा हफ्ते16
१७वा हफ्ता जमा होण्याची तारीख१८ जून २०२४

पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिनांक 18 जून 2024 रोजी जमा होणार आहे. यासाठी वाराणसी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्या ठिकाणाहूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी या हप्त्याचे वितरण करतील आणि सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मंगळवार दिनांक 18 जूनला हप्ता जमा होणार आहे.

Pm Kisan 17th Installment List

या हप्त्याची लाभार्थी यादी तुम्ही आता पीएम किसान च्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकणार आहात. जर तुम्हाला सोळावा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला सतरावा हप्ता महिन्यात देखील कोणतीही अडचण नसणार आहे परंतु जर तुम्हाला यापूर्वीचे काही हप्ते मिळाले नसते तर तुम्हाला पीएम किसानच वेबसाईटवर जाऊन बेनिफिशरी स्टेटस चेक करायचा आहे.

बेनिफिशरी स्टेटस मध्ये तुम्हाला इ केवायसी, आधार बँक सीडिंग स्टेटस, आणि लँड सीडींग स्टेटस या गोष्टी तपासायच्या आहेत यामध्ये सर्वत्र YES असल्यास तुम्हाला सतरावा आणि त्यासोबत पुढील सर्व हप्ते मिळणार आहेत. यामध्ये कुठे NO असल्यास तुम्हाला सदरील माहिती अपडेट करून घ्यावी लागेल आणि तरच तुम्हाला पुढील हप्ते मिळणार आहेत.

Pm Kisan 17th Installment Date

इ केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकणार आहात तसेच आधार बँक सीडींग स्टेटस नो दाखवत असल्यास तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तुमचे बँक खाते आधार कार्ड ला लिंक करून हा प्रॉब्लेम सॉल करू शकणार आहात तर लँड सीडींग नो दाखवत असल्यास तुम्हाला तुमच्या गाव कामगार तलाठी यांच्याकडे जाऊन तुमच्या जमिनीची माहिती अपडेट करून घ्यावी लागणार आहे आणि असे करून तुम्ही सर्व एरर किंवा अडचणी दुरुस्त करू शकणार आहात.Pm Kisan 17th Installment Date

पीएम किसान लाभार्थी यादी पाहण्यासाठीक्लिक करा
पीएम किसान नवीन अर्ज करण्यासाठीक्लिक करा