Pm Kisan 17th installment List Marathi | पीएम किसानचे २००० रु.आज किती वाजता जमा होणार ? पहा यादी व माहिती

Pm Kisan 17th installment List Marathi देशातील सुमारे 09 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज दिनांक 18 जून 2024 रोजी पीएम किसान या योजनेचा सतरावा हप्ता जमा होणार आहे या हप्त्याची सर्व तयारी झाली असून आज वाराणसी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. कोणाच्या बँक खात्यावर आज पैसे जमा होणार ? कोणाच्या बँक खात्यावर उद्या पैसे जमा होणार ? आणि आज जमा होणारे पैसे किती वाजता होणार याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात आली आहे.

Pm Kisan Samman Yojana 17 Installment Date

शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारत देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वात प्रथम सहित ही शेतकऱ्यांसाठी असलेल्या पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणाच्या फाईलवर केली. शेतकरी हा या देशाचा कणा असून शेतकऱ्यांसाठी हे सरकार कायम कटिबद्ध राहील असे देखील यावेळी सांगण्यात आले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

संपूर्ण देशभरात सध्या चांगल्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने खरीप हंगाम मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहे यातच शेतकऱ्यांना आता धान्य खरेदीसाठी बी बियाण्यांसाठी या हप्त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशातील लाभार्थी शेतकऱ्यांकडून या हप्त्याच्या वितरणाचे स्वागत करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्या बद्दल बोलायचे झाल्यास राज्यातून सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज आणि उद्या 2000 रुपये जमा केले जाणार आहेत.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krushi Solar Pump Yojana Maharashtra मागेल त्याला सोलर कृषीपंप अर्जप्रक्रिया सुरु लगेच करा अर्ज | Krushi Solar Pump Yojana Maharashtra

पी एम किसान सन्मान योजना 2019 पासून संपूर्ण देशभरात कार्यरत असून या योजनेद्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये 3 हप्त्यांद्वारे दिले जातात. या योजनेला अधिक व्यापक बनवण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी अधिकचे प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे आणि या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकार द्वारे देखील वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 12000 रुपये या दोन्ही योजनांच्याद्वारे मिळतात.

Pm Kisan yojana 17th installment Date

आज किती वाजता जमा होणार पीएम किसान योजनेचा हफ्ता ?

पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आता सतराव्या हप्त्याच्या वितरणाबद्दल अपडेट देण्यात आली असून यामध्ये सांगितल्याप्रमाणे आज दिनांक 18 जून 2024 रोजी सायंकाळी ठीक ०५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच सायंकाळी 06 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २००० रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

हे पण वाचा:
Pik Vima Last Date 2024 Maharashtra पिक विमा भरण्यासाठी आज आहे शेवटची मुदत लगेच भरा आपला अर्ज | Pik Vima Last Date 2024 Maharashtra

कोणत्या शेतकऱ्यांना आज पैसे जमा होणार तर कोणत्या शेतकऱ्यांना उद्या पैसे जमा होणार याबद्दल बोलायचे झाल्यास ज्या बँक ही प्रक्रिया लवकर प्रोसेस करणार आहेत अशा शेतकऱ्यांना आजच रात्री या योजनेद्वारे मिळणाऱ्या २००० रुपयांचा लाभ मिळणार आहे. तर काही बँक सर्व प्रॉब्लेम किंवा इतर अडचणीमुळे ही प्रोसेस उशिरा करतात आणि परिणामी शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास थोडासा उशीर होतो. परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळाला होता त्या सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता देखील आज अथवा उद्या मिळणार आहे.Pm Kisan 17th installment List Marathi

Pm Kisan 17th installment List Marathi