या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रु.प्रोत्साहन अनुदान जमा पहा यादी | Protsahan Anudan Yojana Maharashtra

Protsahan Anudan Yojana Maharashtra शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे प्रोत्साहन पर अनुदान म्हणून राज्य सरकारने 2019 वर्षी शेतकऱ्यांना जे शेतकरी पीक कर्जाची परतफेड वेळेवर करतात अशा सर्व शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान स्वरूपात बँक खात्यावर जमा केले होते आणि या योजनेमध्ये काही शेतकरी अटींमुळे प्रलंबित देखील राहिले होते पुन्हा एकदा या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता पैसे जमा केले जाणार आहेत.

Mahatma Fule karjmafi Yojna 2024 GR

शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी योजना शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर दिनांक 05 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते आणि त्यानुसारच प्रोत्साहन पर अनुदानापासून प्रलंबित राहिलेल्या शेतकऱ्यांना सदरील अनुदान जमा करण्यासाठी राज्य सरकारकडून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी ही राज्य सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वीच केल्याने या योजनेच्या लाभासाठी आचारसंहितेची कोणतीही अडचण नसणार असल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पुढील आठवड्यात हे पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु सदरील जमा होणारा निधी हा फक्त आणि फक्त कोल्हापूर या जिल्ह्यासाठीच असणार असल्याचे सदरील अधिसूचनेमध्ये सांगण्यात येत आहे.

दुष्काळ अनुदान लाभार्थी यादी पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

या शासन निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

Protsahan Anudan 5th List

शेतकरी मित्रांनो 2019 मध्ये राज्य सरकारच्या वतीने कर्जमाफीची योजना संपूर्ण राज्यात पार पडली आणि यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट 02 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आणि यातच जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेड करतात किंवा दरवर्षी नवे जुने करून आपले कर्ज खाते थकबाकी जाऊन देत नाहीत अशा शेतकऱ्यांना त्यांची असणारी कर्ज रक्कम जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत थेट बँक खात्यात अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला होता.

आणि यानुसार सोसायटी मधून किंवा राष्ट्रीयकृत बँकातून ज्या शेतकऱ्यांनी सदरील कर्ज काढून ते नवे जुने केले होते अशा सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यात आली यासाठी याद्या प्रसिद्ध करण्यात येऊन यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा देखील करण्यात आली.

शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

Protsahan Anudan 3rd List

परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी काही अटींमुळे या योजनेच्या लाखापासून वंचित राहिल्याचे लक्षात आले होते आणि यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता अटींमध्ये सूट देऊन शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन पर अनुदान जमा केले जाणार आहे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर शासन निर्णय प्रसिद्ध देखील करण्यात आला आहे. तुम्ही देखील खालील लिंक वर जाऊन सदरील शासन निर्णय पाहू शकणार आहात.

लाभार्थी यादी पाण्यासाठी शेतकरी बँकेमध्ये जाऊन यादी पाहू शकणार आहेत यामध्ये कोल्हापूर जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना अनुदान जमा करण्याचा सर्व गुंतागुंतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे असे कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी सांगितले आहे आणि त्यानुसारच 2017-18 वर्षात दोनदा उचल घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 1400 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Protsahan Anudan Yojana Maharashtra

येणाऱ्या 08 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सदरील पैसे जमा केले जाणार आहेत यासाठी राज्य सरकारकडून 27 तारखेला निधी देण्यात आला आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा देखील मिळणार आहे अधिकच्या माहितीसाठी खाली दिलेल्या शासन निर्णय शेतकऱ्यांनी सविस्तर पाहायचा आहे.Protsahan Anudan Yojana Maharashtra

शेतकरी लाभार्थी यादी व शासननिर्णय पाहण्यासाठी – इथे क्लिक करा