Namo Rojgar Melava Pune 2024 मित्रांनो तुमचे शिक्षण दहावी पास आहे, आयटीआय आहे, बारावी पास आहे, डिप्लोमा किंवा इंजिनीयर, विविध क्षेत्रातून पदवीधर, एमबीए तर अशा सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी राज्य सरकार द्वारे पुणे जिल्ह्यात सर्वात मोठा नमो महा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आणि या मेळाव्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
राज्यातील बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठी व अनेक शिक्षित युवकांना त्यांच्या शिक्षणाानुसार विविध कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात असल्याचे सांगितले आहे. यामध्ये आता पुणे जिल्ह्यासाठी हा रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.
Namo Maharojgar Melava Baramati 2024
मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये बारामतीत दिनांक 02 मार्च 2024 व दिनांक 03 मार्च 2024 रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि यासाठी पुणे जिल्हा व आसपासच्या जिल्ह्यांतील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये दहावी पास, आयटीआय त्यासोबतच विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना देखील वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
सदरील मेळाव्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले रजिस्ट्रेशन केल्यानंतर दिलेल्या पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. या ठिकाणी उमेदवारांची विशिष्ट कंपनीमध्ये मुलाखत घेण्यात येईल आणि त्यानंतर पात्र झालेल्या उमेदवारांना थेट नोकरी देण्यात येणार आहे.
बारामती मध्ये होणाऱ्या सदरच्या मेळाव्यासाठी अनेक नावाजलेल्या कंपन्या उपस्थित राहणार असल्याचे अधिकृत वेबसाईटवर सांगण्यात आले आहे. यानुसार किर्लोस्कर, आयकॉन टेक्नॉलॉजी, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, एक्सीला टेक्नॉलॉजी लिमिटेड यांसारख्या नावाजलेल्या अनेक कंपन्या सदरील मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत.
Namo Maharojgar Melava Registration 2024
हा मिळावा संपूर्णपणे राज्य सरकार द्वारे घेण्यात येणार असल्याने यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. परंतु सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने महास्वयमच्या वेबसाईटवर जाऊन स्वतःची नाव नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे.
भरतीचे नाव – नमो महारोजगार मेळावा 2024 बारामती, पुणे
विभाग – खाजगी नोकरी
भरली जाणारी पदे – मेकॅनिकल,वेल्डर, मशीनिस्ट, आयटी विभाग, डेटा एन्ट्री ऑपरेटर, कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह, डॉक्टर, नर्स, मेडिकल एक्झिक्यूटिव्ह अशी विविध प्रकारची पदे
निवड प्रक्रिया – थेट मुलाखती द्वारे निवड
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करणे शुल्क – नाही
शैक्षणिक पात्रता – दहावी पास, आयटीआय, डिप्लोमा, विविध क्षेत्रातील पदवीधर
मेळावा दिनांक – 02 मार्च 2024 व 03 मार्च 2024
मेळावा ठिकाण – विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, विद्यानगरी, (एमआयडीसी) बारामती
मेळाव्याची वेळ – सकाळी 10 ते सायं 05 वाजेपर्यंत
Namo Maharojgar Melava Pune Apply Online
सदर मेळाव्यासाठी सर्व उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.
या मेळाव्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे.
नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही.
पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.Pune Job fair 2024
उपस्थित राहताना उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्र ओरिजनल घेऊनच यावे.
मेळाव्याचा अर्ज करण्यासाठी ची लिंक खाली देण्यात आली आहे.
या मेळाव्याची नोंदणी करण्यासाठी | इथे क्लिक करा |
या मेळाव्याची जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
सेन्ट्रल बँक भरतीचा अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |