नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता १७९२ कोटी रु.निधी वितरीत GR पहा | Namo Shetkari 2 Installment Date

Namo Shetkari 2 Installment Date नमस्कार शेतकरी मित्रांनो कालच पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता देशभरात 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 28 फेब्रुवारी 2024 ला जमा होणार असल्याचे आपण पाहिले आहे. अधिकृत वेबसाईटवर सदरील तारखे बद्दल माहिती देण्यात आली आहे.

पी एम किसान योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना बँक खात्यात दोन हजार रुपये येत्या 28 फेब्रुवारीला जमा होणार आहेत. परंतु सर्व शेतकऱ्यांसाठी असा पुन्हा एकदा एक मोठी खुशखबर समोर येत आहे कारण राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार द्वारे देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील पुढील हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Namo Shetkari Yojana 2st Installment Date

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाचा अधिकृत शासन निर्णय महाराष्ट्र राज्य कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याद्वारे जाहीर करण्यात आला आहे. आणि या शासन निर्णयानुसार नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी आता शेतकऱ्यांना १७९२ कोटींचा निधी मिळणार आहे.

आणि यामुळे पहिल्या हप्त्याच्या तुलनेत दुसऱ्या हप्त्यामध्ये वितरित होणाऱ्या निधीची वाढ झाल्याचे आपण पाहत आहे. नमो शेतकरी योजना संपूर्णपणे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेची संलग्न आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 पासून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून राज्य सरकार वार्षिक ६००० रुपये देणार असल्याची घोषणा केली होती.

सदरील योजनेचा पहिला हप्ता 28 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता पहिले हप्त्याच्या लाभार्थींच्या तुलनेत दुसऱ्या हप्त्यामध्ये लाभार्थी संख्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे दुसरा हप्ता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Namo Shetkari Yojana 2 Installment Date

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. सदरील योजनेच्या लाभार्थींना आता निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे दुसऱ्या हप्त्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात असल्याचे पाहायला मिळत आहे.

पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे या दिवशी शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांना वितरित केल्यास महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकाच दिवशी ४००० रुपये जमा होणार आहेत.

परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणाच्या तारखेबद्दल अद्याप अधिकृतपणे घोषणा झाली नसल्याने याबद्दल येत्या दोन ते तीन दिवसात राज्य सरकार द्वारे अधिकृत दिनांक सांगण्यात येणार असल्याचे समजत आहे. सदरील योजनेचा हप्ता जमा होण्याची तारीख तुम्हाला अपडेट देण्यात येईल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता.

Namo Shetkari Yojana Online Registration

नमो शेतकरी योजनेसाठी नवीन लाभार्थी नोंदणी सुरू आहे. यासाठी राज्यातील सर्व पात्र म्हणजेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज सबमिट करावा लागणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना काही अटी देण्यात आले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Namo Shetkari 2 Installment Date
  • लाभ घेणारा शेतकरी हा महाराष्ट्रीयन रहिवासी असावा.
  • शेतकऱ्याच्या नावावर पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र असावे.
  • शेतकरी पती-पत्नी पैकी एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • लाभ घेणारा शेतकरी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य नसावा.
  • लाभ घेणारा शेतकरी सरकारी नोकरदार नसावा.
  • शेतकरी इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
नमो शेतकरी योजना 2 हफ्ता GR पाहण्यासाठीइथे क्लिक करा
नमो शेतकरी योजना नवीन अर्ज भरण्यासाठीइथे क्लिक करा
शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा