ऑईल इंडिया मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 80 हजार | Oil India Bharti 2024

Oil India Bharti 2024 मित्रांनो तुम्ही चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठीच ही एक चांगली संधी असणार आहे. देशाच्या ऑइल इंडिया विभागामध्ये विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये विविध क्षेत्रातून पदवीधर असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

ऑईल इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 11 मार्च 2024 पर्यंतची मुदत आहे. भरतीचा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Oil India Recruitement 2024

ऑईल इंडिया मध्ये निघालेल्या सदरच्या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. या भरतीचा अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असून गेली महिन्याभरापासून सदरील भरतीसाठी उमेदवार अर्ज करत आहेत. आकर्षक पगार व कायमस्वरूपी ची नोकरी हे या भरतीचे वैशिष्ट्य असणार आहे.

सदरील भरतीमध्ये अधीक्षक अभियंता म्हणजेच सुपर इंटेंडिंग इंजिनियर या पदासाठीच्या रिक्त असणाऱ्या जागांची भरती करण्याची ही जाहिरात आहे. यामध्ये विविध क्षेत्रातून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

या भरतीमध्ये ऑनलाइन परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे निवड केल्यानंतर सुरुवातीलाच उमेदवारांना 80 हजार एवढा आकर्षक पगार दिला जाणार आहे. संपूर्ण देशभरातील उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी 11 मार्च 2024 च्या आधी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपले अर्ज व सोबत सर्व आवश्यक कागदपत्र सबमिट करू शकणार आहेत.

Oil India Job Vacancy 2024

भरतीचे नाव – ऑइल इंडिया लिमिटेड भरती 2024

विभाग – सरकारी नोकरी

पदाचे नाव – अधीक्षक अभियंता

शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून 65 टक्के गुणांसह अभियंता पदवी असावी आणि सोबत 04 वर्षांचा अनुभव असावा.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत – 11 मार्च 2024

वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 वर्षे ते 34 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
  • एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी रुपये 500 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी शुल्क नाही.

Oil India Bharti 2024 Apply Online

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

या भरतीचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

वेबसाईट ओपन होत नसल्यास मोबाईल वर स्क्रीन रोटेट करून “शो डेस्कटॉप साईट ” वर क्लिक करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Oil India Bharti 2024

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
भारतीय रेल्वे भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा