पीएम किसान लँड सीडींग अपडेट करा मोबाईल मधून अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत | Pm Kisan Land Seeding

Pm Kisan Land Seeding Update Marathi शेतकरी मित्रांनो देशातील सर्व 12 कोटी पीएम किसान सन्मान योजना लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना लँड सीडींग अपडेट करण्यासाठी आता सुविधा उपलब्ध झाली आहे. याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली असून कृषी विभागाला आदेश देखील देण्यात आले आहेत.

Land Seeding Update Pm kisan Marathi

देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून 2019 वर्षापासून पीएम किसान सन्मान योजना संपूर्ण देशात राबवण्यात आली. . या योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र व लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यास सुरुवात झाली. पी एम किसान योजनेचा लाभ देशातील बारा कोटी शेतकरी व राज्यभरातील 93 लाख शेतकरी घेत आहेत.

पी एम किसान योजनेच्या स्वरूप म्हणजे दोन हजार रुपये प्रमाणे प्रत्येक वर्षी तीन हप्ते असे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे जमा करण्यात येतात. या योजनेच्या अंतर्गत आजवर सर्व पात्र शेतकऱ्यांना 15 हप्ते मिळाले आहेत म्हणजेच प्रत्येकी शेतकरी तीस हजार रुपये आजवर पी एम किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

Land Seeding Update Online Process

2022 मध्ये सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या लाभासाठी ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते यासोबतच आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे आणि लँड सीडिंग म्हणजेच जमिनीची माहिती अद्यावत करून घेण्यास सांगण्यात आले होते.

यामध्ये शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून मोफत केवायसी तसेच आधार कार्ड ला बँक खाते लिंक करू शकत होता परंतु शेतकऱ्यांना लँड सीडींग करताना अनेक अडचणी येत आहेत कारण ही प्रक्रिया मोबाईलवरून करता येत नाही. म्हणजेच शेतकरी मित्रांनो तुमच्या पीएम किसान च्या बेनिफिशरी स्टेटस मध्ये लँड सीडींग नो हा एरर येत असेल तर तुम्हाला तुमच्या महसूल कार्यालयात जावे लागणार आहे.

महसूल कार्यालयात पी एम किसान च्या लँड सीडिंग अपडेट साठी लॉगिन करून पर्याय देण्यात आला आहे ज्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे आणि महसूल कार्यालयात जाऊन पीएम किसान संदर्भातील अधिकारी किंवा कृषी अधिकारी यांची भेट घेऊन तुम्ही तुमचे जमिनीची माहिती अद्यावत करून घेऊ शकता. यासाठी तुम्ही महसूल कार्यालयात जाताना सातबारा, आठ अ उतारा व तुमचे आधार कार्ड देखील घेऊन जायचे आहे.Pm Kisan Land Seeding

Pm Kisan Land Seeding
या योजनेची लाभार्थी यादी pdf पाहण्यासाठीक्लिक करा
पीएम किसान योजना नवीन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठीक्लिक करा