Shetkari Pension Yojana राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांनो तुम्ही देखील शेतकरी पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी देखील ही अपडेट महत्त्वाचे असणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पेन्शन मिळत नसेल त्यांच्यासाठी देखील आता शेवटची संधी उपलब्ध आहे.
मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करण्यात प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक मदत म्हणून पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे ज्या योजनेच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये दिले जातात आणि या योजनेचा लाभ राज्यातून 93 लाख शेतकरी घेत आहेत.
Shetkari Pension Yojana Maharashtra 2024
शेतकरी पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2024 असणार आहे. यानंतर तुम्ही शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुमचे अर्ज करू शकणार आहात. हे अर्ज करण्यास कोणत्याही प्रकारची शुल्क घेतली जाणार नाही.
केंद्र सरकार द्वारे देशातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना ही पेन्शन दिली जाते 2019 यावर्षी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत म्हणून ही पेन्शन योजना जाहीर करण्यात आली. पी एम किसान सन्मान योजना असे या योजनेला नाव देण्यात आले आणि या योजनेनुसार शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात वार्षिक सहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली.
त्यानुसार देशभरातून बारा कोटी शेतकऱ्यांना डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात दोन हजार रुपये प्रमाणे तीन हप्ते असे एकूण सहा हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. या योजनेसाठी सुरुवातीला शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील तलाठी किंवा कृषी यांच्याकडे आपली कागदपत्रे आधार कार्ड, बँक पासबुक, सात बारा व आठ उतारा जमा करण्यास सांगितले.
Shetkari Pension Yojana New Registration
2019 पासून ते 2023 पर्यंत केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पेन्शन स्वरूपात आजवर 15 हप्ते प्रत्येकी दोन हजार रुपयाने जमा करण्यात आले आहेत म्हणजेच केंद्र सरकारकडून 2019 पासून शेतकऱ्यांना प्रत्येकी 30 हजार रुपये देण्यात आले आहेत. आणि ही योजना अजूनही सुरू असून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारकडून या योजनेचा सोळावा हप्ता देखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या या योजनेत भर टाकण्यासाठी राज्य सरकारने देखील 2023 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित केली आहे आणि या योजनेद्वारे केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांमध्ये राज्य सरकारकडून देखील सहा हजार रुपये देऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळण्यास सुरुवात झाली.
महाराष्ट्र सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी तर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे अर्ज भरण्याची देखील आवश्यकता लागली नाही कारण पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ थेट मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली. कारण नमो शेतकरी योजनेसाठी पीएम किसान सन्मान योजनेसाठी असणारा सर्व डेटाबेस आहे असाच घेण्यात आला.
Namo Shetkari Yojana 2nd Installment Date
शेतकरी मित्रांनो 2024 मध्ये देशभरात केंद्र व राज्य सरकार दोन्ही निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे देण्यात येणाऱ्या पेन्शनची रक्कम आता सहा हजार रुपयांवरून आठ हजार रुपये करण्यात येणार आहे याबाबत आता लवकरच घोषणा देखील होणार आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना हा चांगला लाभ मिळणार आहे.
तुम्ही देखील शेतकरी असाल तुमच्या नावावर स्वतंत्र सातबारा असेल आणि अजूनही तुम्ही पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचा लाभ घेत नसाल तर आजच खाली लिंक वर जाऊन तुमच्या मोबाईलवरून मोफत अर्ज करून शेतकरी पेन्शन योजनांचा लाभ घेऊ शकणार आहात.
शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
शेतकरी पेंशन योजना यादी पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
दुग्ध व्यवसाय कर्ज योजना अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
नियम व अटी –
- लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर स्वतंत्र सातबारा असावा.
- शेतकरी हा आमदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा खासदार नसावा. शेतकरी हा सरकारी नोकरदार नसावा.
- शेतकऱ्याने आयटीआर म्हणजेच इन्कम टॅक्स भरलेला नसावा.
- शेतकरी दांपत्यापैकी एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकणार आहात.Shetkari Pension Yojana