Sinchan Yojana Maharashtra 2024 राज्यातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व चांगली योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन उभारणीसाठी 55 टक्के अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी तसेच पाण्याचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे.
Sinchan Anudan Yojana 2024
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात कृषी विकास योजनेअंतर्गत उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब वाया न जाण्यासाठी आणि याचा फायदा शेतकऱ्यांच्या पिकासाठी होण्यासाठी पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक अर्थात सूक्ष्म जलसिंचन योजना होय.
या योजनेमध्ये केंद्र सरकारचा 60 टक्के आणि त्याला जोडून राज्य सरकारच्या 40% हिस्सा असणार आहे राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे त्यामुळेच ठिबक व तुषार संच उभारणीसाठी अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. यामध्ये अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना पाच एकरच्या पेक्षा कमी शेती असावी.
Thibak Sinchan Anudan List pdf Maharashtra
या योजनेअंतर्गत आजवर सन 2022 23 मध्ये एकूण 556.66 कोटी निधी उपलब्ध झाला याद्वारे महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेले अनुदानास पात्र असलेले 2,22,225 लाभार्थी शेतकऱ्यांना रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी विभागाने ही योजना महाडीबीटी द्वारे विकसित केली आहे ज्यामुळे शेतकरी स्वतः अर्ज करू शकणार आहेत आणि सर्व माहिती देखील पाहू शकणार आहेत.
या योजनेचा लाभ ठिबक व तुषार सिंचन या दोन्ही सिंचनांना दिला जातो शेतकऱ्यांनी त्यांच्या पसंतीच असलेल्या घटकांच्या निवडीचे स्वातंत्र्य दिले असून ही योजना सुरू झाल्यापासून राज्यातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र सिंचनाखाली आल्याचे निदर्शनास देखील आले आहे. तुम्ही देखील सिंचन करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच या योजनेचा फायदा घेऊन 55 टक्के अनुदान मिळू शकणार आहात.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
शेतकरी पेंशन योजनेचा अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
दुध अनुदान योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
Sinchan Anudan List 2023 Maharashtra
या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
हे रजिस्ट्रेशन करत असताना तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक असणार आहे.
स्वतःच्या मोबाईल वरून कम्प्युटर वरून किंवा आपले सरकार सेवा केंद्र सीएससी मध्ये जाऊन शेतकरी त्यांची नोंदणी करू शकणार आहेत.
सर्व माहिती सविस्तर भरल्यानंतर अर्ज सबमिट करून द्यायचा आहे.
आणि अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला मिळणारा विशिष्ट क्रमांक सोबत ठेवायचा आहे आणि त्या अर्जाची प्रिंट देखील घ्यायची आहे.Sinchan Yojana Maharashtra 2024