विमा कंपन्यांना आदेश देऊनही या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीकविमा नाही | Pik Vima Pending List

Pik Vima Pending List राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे पिक विमा योजनेसाठी राज्यातील शेतकऱ्यांना 24 जिल्ह्यासाठी तब्बल 2200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता . यापैकी 17 जिल्ह्यांसाठी यापूर्वीच सोळाशे पन्नास कोटींचा निधी वितरित देखील करण्यात आला होता. परंतु उर्वरित शेतकरी अजूनही पिक विमा च्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

पिक विमा साठीची पेंडिंग असणारी यादी आता समोर आली आहे आणि त्यानुसार उर्वरित देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर निधी देण्यात येणार आहे यामध्ये असणाऱ्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी आता काम सुरू आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Pik Vima Yojana Maharashtra 2024

शेतकरी मित्रांनो राज्यात 2023 मध्ये खरीप हंगामात सरासरीच्या 50 ते 55 टक्के पावसाचे प्रमाण कमी राहिले आणि परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. . पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्याचा खरीप हंगाम वाया गेला आणि त्यामुळे शेतकरी कोळमळून पडला.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Cochin Shipyard Bharti 2024 कोचीन शिपयार्ड लि.अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरभरती | Cochin Shipyard Bharti 2024

शेतकऱ्यांना दुष्काळ परिस्थितीशी तोंड देण्यासाठी आणि आर्थिक मदत म्हणून पिक विमा योजनेचे पैसे सरसकट मंजूर करण्यात आले यामध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या 42 तालुक्यांसाठी तब्बल 2200 कोटींचा निधी नुकसान भरपाई म्हणून देखील मंजूर करण्यात आला आहे आणि त्यासाठी देखील आता लवकरात लवकर यादी प्रसिद्ध होऊन नुकसान भरपाईची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

Pik Vima List 2023

पीक विमा मंजूर रकमेत राज्यातून मराठवाड्यासाठी सर्वाधिक निधी मंजूर झाल्याचे आपण पाहिले यामध्ये बीड जिल्हा असेल किंवा धाराशिव असेल जालना या जिल्ह्यांसाठी सर्वाधिक पिक विमा रक्कम मंजूर करण्यात आली. यानुसार राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात देखील आली.

पिक विम्याचे 17 जिल्ह्यांसाठी सोळाशे पन्नास कोटींचा निधी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला उर्वरित सात जिल्ह्यांसाठी अजूनही प्रक्रिया चालू असल्याची माहिती विमा कंपन्यांकडून देण्यात येत आहे. यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी कृषीमंत्र्यांनी व महाराष्ट्र कृषी विभाग कडून पिक विमा कंपन्यांना सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 15 जानेवारी 2024 च्या आधी पिक विमा रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे पण वाचा:
PCMC Recruitement 2024 पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी | PCMC Recruitement 2024

या आदेशानुसार आता पिक विमा कंपन्या देखील शेतकऱ्यांना पैसे देण्यास मंजूर झाल्याची माहिती देत आहेत आणि यामुळेच उर्वरित देखील सात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना साडेसहाशे कोटी रुपये पिक विमा निधी जमा करण्यात येणार आहे आणि यामुळेच शेतकऱ्यांसाठी हा मोठा फायदा असणार आहे.

Pik Vima Pending List

Pik Vima Pending List 2024

यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते आणि ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता यासोबत खरीप हंगाम 2023 ची पिक पाहणी केली होती अशा सर्व शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ देण्यात येणार आहे. याची संपूर्ण प्रक्रिया जी यादी पेंडिंग मध्ये होती त्यांच्यासाठी देखील अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.

शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
पिक विमा लाभार्थी यादी पाहण्यासाठीइथे क्लिक करा

यासोबतच लवकरच आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी तसेच नमो शेतकरी महासंघ निधी या दोन्ही योजनांचा पुढील हप्ता जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात येणार आहे. या सर्व लाभासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे अनिवार्य असणार आहे. हा सर्व निधी डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतो आणि त्यामुळेच शेतकऱ्यांनी आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे आवश्यक आहे.Pik Vima Pending List

हे पण वाचा:
डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024